"बिहार पोलिसांना एकही पदक नाही, भाजपने बोध घ्यावा"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 04:33 IST2020-08-17T04:33:24+5:302020-08-17T04:33:28+5:30
सावंत म्हणाले, अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासावरून मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्याचा कृज्ञघ्नपणा महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी वारंवार केला आहे.

"बिहार पोलिसांना एकही पदक नाही, भाजपने बोध घ्यावा"
मुंबई : केंद्रीय गृह विभागाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना यावर्षी एकही पदक मिळालेले नाही, तर त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना तब्बल ५८ पदके मिळाली आहेत. यावरून तरी बिहार पोलिसांचे गुणगान गाणाºया भाजप नेत्यांनी बोध घ्यावा, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सावंत म्हणाले, अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासावरून मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्याचा कृज्ञघ्नपणा महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी वारंवार केला आहे.
मुंबई पोलीस सुशांतसिंग प्रकरणाचा तपास उत्तमरित्या करत असताना त्यांच्या तपासावर संशय घेतला गेला. तपास सीबीआयला देण्याची मागणी करून मुंबई पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो फसला. कारण, केंद्रीय गृहमंत्रालयाने मुंबई व महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांना पदके देऊन त्यांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यातील भाजप नेत्यांसाठी ही मोठी चपराक असल्याचे सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.