मुंबई - लोकसभेला काँग्रेसने 'फेक नरेटिव्ह' तयार केला. पण, तो आता संपलाय हे काँग्रेसला कळले नाही. काँग्रेसने सत्य स्वीकारून आत्मपरीक्षण केले नाही, तर यापेक्षाही काँग्रेसची अवस्था वाईट होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या निकालावर व्यक्त केली.
ते म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत इतर सर्व मुद्दे बाजूला पडले. केवळ विकास आणि सुशासन हाच मुद्दा प्रमुख ठरला. बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यावर प्रेम आणि विश्वास दाखविला. हा मागचे रेकॉर्ड तोडणारा विजय आहे. बिहारच्या जनतेने पंतप्रधान मोदी आणि नितीशकुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमत दिले. पंतप्रधान मोदींवर बिहारचा जो विश्वास आणि प्रेम आहे, हे दिसून येते आहे.
'लाडक्या बहिणींचा करिष्माः : शिंदेजनतेने विकासाला प्राधान्य दिले व महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमधील लाडक्या बहिणींनी 'एनडीए'वर प्रेम दाखवत आम्हाला पूर्ण बहुमत दिले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर, नितीशकुमार यांनी केलेल्या कामावर बिहारने शिक्कामोर्तब केले. त्यांचे आणि बिहारच्या लाडक्या बहिणींचे मी मनापासून अभिनंदन करतो. बिहारमध्ये महिलांच्या मतदानात वाढ झाली, त्यामुळेच 'एनडीए'ला मिळाला, असेही शिंदे म्हणाले.
तयार केलेला 'फेक नरेटिव्ह' संपला, विकास अन् सुशासन हाच मुद्दा प्रभावीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभेला काँग्रेसने 'फेकनरेटिव्ह' तयार केला. पण, तो आता संपलाय हे काँग्रेसला कळले नाही. काँग्रेसने सत्य स्वीकारून आत्मपरीक्षण केले नाही, तर यापेक्षाही काँग्रेसची अवस्था वाईट होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या निकालावर व्यक्त केली.ते म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत इतर सर्व मुद्दे बाजूला पडले. केवळ विकास आणि सुशासन हाच मुद्दा प्रमुख ठरला. बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यावर प्रेम आणि विश्वास दाखविला. हा मागचे रेकॉर्ड तोडणारा विजय आहे. बिहारच्या जनतेने पंतप्रधान मोदी आणिनितीशकुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमत दिले. पंतप्रधान मोदींवर बिहारचा जो विश्वास आणि प्रेम आहे, हे दिसून येते आहे. 'लाडक्या बहिणींचा करिष्माः : शिंदेजनतेने विकासाला प्राधान्य दिले व महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमधील लाडक्या बहिणींनी 'एनडीए'वर प्रेम दाखवत आम्हाला पूर्ण बहुमत दिले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर, नितीशकुमार यांनी केलेल्या कामावर बिहारने शिक्कामोर्तब केले. त्यांचे आणि बिहारच्या लाडक्या बहिणींचे मी मनापासून अभिनंदन करतो. बिहारमध्ये महिलांच्या मतदानात वाढ झाली, त्यामुळेच 'एनडीए'ला मिळाला, असेही शिंदे म्हणाले.
बिहारच्या इतिहासातील काँग्रेसचा सर्वात कमी स्कोअरकाँग्रेस आणि राहुल गांधी यांनी जो विषारी प्रचार चालविलेला आहे, त्याला जनतेने उत्तर दिले आहे. सातत्याने संवैधानिक संस्था, कारभाराला विरोध करणे, जनतेच्या मताला विरोध करणे, यामुळे जनतेच्या लक्षात येत आहे, राहुल गांधी मतांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची अवस्था हीच होईल.काँग्रेस तर एमआयएमपेक्षा खाली गेली आहे. बिहारच्या इतिहासातील हा काँग्रेसचा सर्वात कमी स्कोअर आहे. राहुल गांधींनी व्होटचोरीचा आरोप केला, यात्रा काढली, नदीत उडीही मारून बघितली, पण लोकांचा विश्वास मोदी-नितीश यांच्यावरच आहे, असेही फडणवीस म्हणाले.
"बिहार तो झांकी है, मुंबई अभी बाकी है""बिहार तो झांकी है, मुंबई अभी बाकी है".. अशा घोषणा देत, ढोल ताशे वाजवत जल्लोष करण्यात आला. यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, की निकालात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम राहिली आहे. पंतप्रधान व नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने काही वर्षात ताकदीने केलेल्या विकासकामांमुळे सर्व घटकांची उन्नती झाली. त्यामुळेच बिहारच्या जनतेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल दिला. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता महायुतीला नक्की आशीर्वाद देईल.
Web Summary : Fadnavis says Congress's 'fake narrative' failed in Bihar. Development and good governance prevailed. Shinde credits women voters for NDA's victory. Congress's score lowest ever in Bihar; people trust Modi-Nitish.
Web Summary : फडणवीस ने कहा कि बिहार में कांग्रेस का 'फर्जी नैरेटिव' विफल रहा। विकास और सुशासन की जीत हुई। शिंदे ने एनडीए की जीत का श्रेय महिला मतदाताओं को दिया। बिहार में कांग्रेस का सबसे कम स्कोर; लोगों को मोदी-नीतीश पर भरोसा।