AC Local Services On Western Railway: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वातानुकूलित एसी लोकलची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. मुंबईच्या सर्व लोकल मार्गांवरील एसी लोकल सेवा हळूहळू वाढवल्या जात आहेत. प्रवाशांकडून एसी लोकल सेवांना खूपच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत नजीकच्या काळात सर्वच लोकल एसी करण्यावर सरकार काम करत आहे.
मुंबईत पश्चिम रेल्वेवरून सर्वात पहिली वातानुकूलित लोकल डिसेंबर २०१७ रोजी धावण्यास सुरुवात झाली. जानेवारी २०२० रोजी मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरून पहिली वातानुकूलित लोकल धावली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर डिसेंबर २०२० पासून सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दुसरी वातानुकूलित लोकल चालविण्यास सुरूवात केली. तर, जानेवारी २०२२ मध्ये सीएसएमटी ते वाशी/ पनवेल आणि वांद्रे / गोरेगाव दरम्यान वातानुकूलित लोकल सेवा धावत होती. यानंतर आता पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा, यासाठी पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेवरील AC Local संख्या १३३ वर
आता उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. लोकलमध्ये असणारी गर्दी आणि उष्णता याचा विचार करता पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून वातानुकूलित लोकल १३३ करण्यात आल्या आहेत. तर, शनिवार आणि रविवारी १०६ वातानुकूलित लोकल धावतील. नोव्हेंबर २०२४ मध्ये पश्चिम रेल्वेवरील ९६ वातानुकूलित लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करून १०९ लोकल फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली. या निर्णयाने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह शनिवार आणि रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, यावर्षी अनेक लोकल वाढवण्यात आल्या आहेत. यामध्ये वातानुकूलित लोकलचाही समावेश आहे. पश्चिम रेल्वेवर जानेवारीत १२ नव्या वातानुकूलित लोकल सुरू केल्या. फेब्रुवारीत आणखीन १२ नवीन वातानुकूलित लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची सुविधा वाढवणे, लोकल सुदृढ करण्याचे उद्दिष्ट १ फेब्रुवारी २०२६ पासून १२ डब्यांची ४ अतिरिक्त सामान्य लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या सेवा सुरू झाल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावर एकूण १,४०६ लोकल फेऱ्यांऐवजी १,४१० लोकल फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली.
Web Summary : Western Railway increases AC local trains to 133, providing relief from summer heat. 106 AC locals will run on weekends. Additional services were added in January and February, increasing total daily trips to 1,410, improving commuter convenience.
Web Summary : पश्चिम रेलवे ने AC लोकल ट्रेनों की संख्या बढ़ाकर 133 कर दी है, जिससे गर्मी में यात्रियों को राहत मिलेगी। सप्ताहांत में 106 AC लोकल चलेंगी। जनवरी और फरवरी में अतिरिक्त सेवाएं जोड़ी गईं, जिससे कुल दैनिक यात्राएं 1,410 हो गईं, जिससे यात्रियों को सुविधा होगी।