भुजबळ....आधीचे आणि आत्ताचे

By Admin | Updated: April 25, 2016 17:45 IST2016-04-25T16:39:51+5:302016-04-25T17:45:36+5:30

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागले आहेत

Bhujbal .... Previous and Present | भुजबळ....आधीचे आणि आत्ताचे

भुजबळ....आधीचे आणि आत्ताचे

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 25 - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. छगन भुजबळ यांचा एक फोटो रविवारी सोशल मिडियावर व्हायरल झाला. वाढलेली पांढरी दाढी, थकलेलं शरिर पाहून फोटोमधील व्हीलचेअरवर बसलेली ही व्यक्ती छगन भुजबळ आहेत असा कोणालाच विश्वास बसला नव्हता. पण आज सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि हे छगन भुजबळच आहेत याची खात्री झाली. 
 
14 मार्चला छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. 40 दिवस कारागृहात राहिल्यानंतर छगन भुजबळ यांच्यात इतका बदल झाला आहे की त्यांना ओळखण कठीण होऊ लागलं आहे. शनिवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात हा फोटो काढण्यात आला होता.  दातदुखी आणि छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्यानंतर 18 एप्रिलला भुजबळांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या 40 दिवसांमध्ये भुजबळांचं 10 किलो वजन कमी झालं आहे.
 
 
 
 

Web Title: Bhujbal .... Previous and Present