पाटील‘राज’ला भोईर यांचे आव्हान

By Admin | Updated: October 4, 2014 22:51 IST2014-10-04T22:51:07+5:302014-10-04T22:51:07+5:30

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून तिकिट न मिळाल्याने तेथून बंड करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आलेल्या रमेश पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभेत विजयी मोहोर उमटवली.

Bhoir's challenge to Patil Raj | पाटील‘राज’ला भोईर यांचे आव्हान

पाटील‘राज’ला भोईर यांचे आव्हान

>अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवली
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून तिकिट न मिळाल्याने तेथून बंड करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आलेल्या  रमेश पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभेत विजयी मोहोर उमटवली. त्या पाठोपाठच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीतही पक्षाला न भूतो असे यश मिळाले होते. 
‘राज’ दरबारी पाटील बंधूंचा दबदबा वाढला. परिणामी यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचे कनिष्ठ बंधू प्रमोद (राजू) पाटील यांना पक्षातर्फे उमेदवारीही मिळाली होती. मात्र गेल्या काही वर्षातील पाटील बंधूंच्या मनमानी आणि व्यावहारिक अपारदर्शकतेच्या कारभाराचा फटका त्यांना बसला अन् त्यांचा पराभव तर झालाच पण डिपॉझीटही जप्त झाले. मात्र तसे असूनही यावेळच्या विधानसभा निवडणूकीसाठी रमेश यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून पाटील ‘राज गड’गडणार की अभेद्य राहणार हे पाहणो औत्स्युक्याचे आहे. अशा घडामोडीतच येथून भाजपाचा उमेदवारच नसल्याने केवळ शिवसेनेच्या सुभाष भोईर आणि मनसेचे पाटील यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. येथूनच राष्ट्रवादी काँग्रेसने वंडार पाटील तर काँग्रेसने शारदा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या हातावर तुरी देत त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्यात शिवसेनेला यश मिळाले. त्यामुळे या ठिकाणी तिघा पाटीलांविरोधात भोईर यांची लढत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीतील मतदानाच्या आकडेवारीचा कौल बघितल्यास येथे पाटील यांचे ‘राज’ कायम ठेवण्यासाठी त्यांना प्रय}ांची पराकाष्ठा करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या विधानसभा मतदार संघात मनसेच्या  प्रमोद (राजू) पाटील यांना लोकसभेला 31,484 मते मिळाली. ती विधानसभेत ज्येष्ठ बंधू रमेश पाटील यांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षा तब्बल 2क् हजारांनी कमी आहेत. म्हणजेच महायुतीची त्यातही शिवसेनेची मते या ठिकाणी वाढली. लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या महायुतीच्या डॉ.श्रीकांत शिंदे यांना या विधानसभा मतदारसंघात 87,927 मते तर पराभूत झालेल्या माजी खासदार आनंद परांजपे यांना 2क्,89क् मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी अन् काँग्रेस या आघाडीच्या उमेदवारापेक्षा महायुतीच्या उमेदवाराला तब्बल 67,क्37 एवढी मते अधिक मिळाली आहेत. या निवडणूकीतही अशीच समीकरणो राहील्यास पाटील यांचा  मार्ग खडतर होऊ शकतो.
काँग्रेसने एकमेव महिला प्रतिनिधीला पक्षाची उमेदवारी दिली असली तरीही त्या पक्षाची पकडही या ठिकाणी नाही आणि राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या वंडार पाटलांना खिंडार पाडण्यासाठी उभे केल्याची चर्चा आहे. त्यामुळे साहजिकच पुन्हा शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्येच ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेनेतही गटातटाच्या राजकारणाला ऊत आला आहे. गेल्या निवडणुकीत पराभव झाला असला तरीही सातत्याने ग्रामीण भागावर पकड ठेवत नागरिकांशी संपर्क ठेवून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अग्रक्रमी मीच असल्याचा दावा करून म्हात्रे यांनी बंड केले होते, मात्र गेल्या निवडणुकीतील पराभूतांना उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याने  भोईर यांना संधी देण्यात आली. 
पाटील बंधूबद्दल असलेली जनमानसातील नाराजी, नात्यांमधील वितुष्ट आणि पक्षांतर्गत मरगळ व्यावहारिक अपारदर्शकता यावर बाजी मिळवून मतदारांचा विश्वास संपादीत करत पाटील यांना या ठिकाणी वर्चस्व ठेवण्याचे कडवे आव्हान आहे. गेल्या काही वर्षाच्या कालावधीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करता सर्वाचे मने राखून मते मिळवण्यासाठी ‘राज’गडावरुन कल्याण ग्रामीणची जबाबदारी राजू पाटील यांना दिली आहे. त्यांनाही लोकसभेतील मोदी लाट असल्याने पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र त्यातून कसेबसे सावरत या ठिकाणी ‘मनसे’ राज्य करण्यासाठी ते सर्वाना राजमंत्र देत आहेत. पण हा फॉम्यरूला यशस्वी होतो की नाही हे नजीकच्या काळात होणारी निवडणूकच ठरवेल.
 
2क्क्9 च्या निवडणुकीत या मतदार संघात 2,45,क्3क् मतदार होते. त्यापैकी 1,23,633 मतदारांनी मतदान केले. त्यापैकी पाटील यांचा 51,149 मते मिळून विजय झाला होता. त्यांनी शिवसेनेच्या रमेश  म्हात्रे यांचा पराभव केला. त्यांना 41,642 मते मिळाली होती. काँग्रेसचे रवी पाटील यांनी 26,546 मते खाल्ल्यामुळे पाटील यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. बसपाच्या मारूति वानखेडे यांना 1237 मते मिळाली होती. येथे एकूण 8 उमेदवार उभे होते. त्या पैकी सहा जणांचे डिपॉझीट जप्त झाले होते. आता यावेळेस  एकूण 11 उमेदवार रिंगणात असून ख-या अर्थाने मनसे-शिवसेना यांच्यात लढत असून कॉग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार बरीच मते खातील, मात्र ती निर्णायक नसतील असेही स्पष्ट संकेत आहेत.

Web Title: Bhoir's challenge to Patil Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.