मायलेकींचे प्राण वाचविणाऱ्या भोईर यांचा पोलिसांकडून सत्कार
By Admin | Updated: October 10, 2014 02:20 IST2014-10-10T02:20:20+5:302014-10-10T02:20:20+5:30
दोन दिवसापूर्वी कोपराखाडीत झालेल्या अपघातात आपल्या जीवाची पर्वा न करता दोन महिलांचे प्राण वाचविणारा विकी भोईर व एकनाथ मुंबईकर यांचा पोलिसांच्यावतीने सत्कार करण्यात आला

मायलेकींचे प्राण वाचविणाऱ्या भोईर यांचा पोलिसांकडून सत्कार
नवी मुंबई : दोन दिवसापूर्वी कोपराखाडीत झालेल्या अपघातात आपल्या जीवाची पर्वा न करता दोन महिलांचे प्राण वाचविणारा विकी भोईर व एकनाथ मुंबईकर यांचा पोलिसांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिरिधर व कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी सत्कार केला .
खारघर खाडीत झालेल्या अपघातात इंडिकाच्या वाहनचालकाचा मृत्यू झाला, मात्र गाडी खाडीत कोसळल्यानंतर दोघी मायलेकींची मदतीसाठीचे ओरड ऐकून विकी भोईर व एकनाथ मुंबईकर यांची तिकडे नजर गेली. यावेळी विकीने त्वरीत पाण्यात उडी घेऊन जवळच असलेल्या लहान होडीच्या सहाय्याने दोघींचा जीव वाचविला. यावेळी एकनाथ मुंबईकरनेही मोलाची मदत केली. तरूणांना प्रेरणा देणाऱ्या विकीने उचललेल्या या साहसी पावलाची सर्वच स्तरातून स्तुती होत आहे. याचीच दखल घेत कळंबोली वाहतूक शाखा व कामोठे पोलीस ठाण्याकडून त्याचा सत्कार करण्यात आला. विकी भोईर व एकनाथ भोईर यांनी आभार मानत अशी मदत पुन्हा कुणाला भासली तर नक्कीच करणार, अशी खात्री दिली. (प्रतिनिधी)