भार्इंदर प्रभाग क्र. ३८ ची पोटनिवडणूक १४ जूनला

By Admin | Updated: May 16, 2015 22:56 IST2015-05-16T22:56:54+5:302015-05-16T22:56:54+5:30

मीरा-भार्इंदर पालिकेच्या प्रभाग क्र. ३८ मधील ‘अ’ या महिलांसाठी राखीव जागेसाठी १४ जून रोजी पोटनिवडणुक पार पडणार आहे.

Bhinderinder ward no. On the 14th bypoll on 38th of June | भार्इंदर प्रभाग क्र. ३८ ची पोटनिवडणूक १४ जूनला

भार्इंदर प्रभाग क्र. ३८ ची पोटनिवडणूक १४ जूनला

भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेच्या प्रभाग क्र. ३८ मधील ‘अ’ या महिलांसाठी राखीव जागेसाठी १४ जून रोजी पोटनिवडणुक पार पडणार आहे.
येथील काँग्रेसच्या नगरसेविका दिप्ती भट यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणुक लागू केली आहे. भट यांनी २०१२ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘ब’ या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार प्रशांत दळवी यांच्याशी हातमिळवणी करुन काँग्रेसचे सहउमेदवार अ‍ॅड. एस. ए. खान यांचा पराभव केला होता. त्यामुळे पक्षात त्यांच्याविरोधात मतप्रवाह तयार झाला होता. तरीदेखील काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व आ. मुझफ्फर हुसेन यांच्या मातोश्री माजी उपमहापौर नुरजहाँ नजर हुसेन यांनी भट यांना मानसपुत्रीचे स्थान देऊन काँग्रेसमध्ये कार्यरत ठेवले. परंतु, पक्षात कुचंबणा तसेच कोणत्याही जबाबदारीच्या पदावर नियुक्ती केली जात नसल्याने नाराज भट यांनी काही महिन्यांपुर्वीच भाजपात जाहिरपणे प्रवेश करुन नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे लागु झालेल्या पोटनिवडणुकीतील भाजपाच्या संभाव्य उमेदवार म्हणुन भट यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे पक्षाच्या सुत्रांकडुन सांगण्यात आले असले तरी या निवडणुकीत पुन्हा विजयश्री खेचुन आणण्यासाठी भट सध्या शिवसेनेशी जुळवुन घेत असताना दिसुन येत आहेत. काँग्रेसने मीरारोड येथील एका कार्यक्रमात प्रिती चव्हाण या महिला उमेदवाराचे नाव जाहिर केले असुन लोकांचा संपर्क देखील सुरु केल्याचे सांगण्यात आले आहे.

पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांना २२ ते २९ मे दरम्यान उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ३० मे रोजी पार पडणार असुन १ जुन रोजी उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान १४ जुन तर मतमोजणी १६ जुन रोजी पार पडणार आहे.

Web Title: Bhinderinder ward no. On the 14th bypoll on 38th of June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.