Join us  

भैय्यू महाराज आत्महत्या : फरार सेवक विनायक दुधाळेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 10:04 AM

भैय्यूजी महाराजांची मुलगी कुहूने आत्महत्येमागील कारणाचा शोध घेण्याची मागणी केली होती.

मुंबई - मध्य प्रदेश सरकारने राज्यमंत्रीपदाचे दर्जा दिलेले अध्यात्मिक गुरू आणि समाजसेवक भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांचा विश्वासू सेवक विनायक दुधाळेला अटक करण्यात आली आहे. भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर विनायक दुधाळे फरार झाला होता. त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना आता यश आले आहे. मुंबईतील आझाद नगर पोलीस ठाण्यात त्याची रवानगी करण्यात आली आहे. 

भैय्यूजी महाराजांची मुलगी कुहूने आत्महत्येमागील कारणाचा शोध घेण्याची मागणी केली होती. तसेच कुठल्याही संस्थेमार्फत चौकशी करा, पण आम्हाला वडिलांच्या मृत्युचे कारण कळू द्या, असेही तिने म्हटरे होते. त्यानंतर, आता सेवक विनायक दुधाळेच्या अटकेनंतर यामागील गुढ उकलले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांकडून दुधाळेला कोर्टात हजर केले जाऊ शकते. त्यानंतर, पोलीस कोठडी मिळताच, त्याच्या चौकशीला वेग येणार आहे.  

अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज यांनी 12 जून रोजी आत्महत्या केली. भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे भक्त, कुटुंबीय सगळ्यांनीच आत्महत्येबद्दल प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. नेहमी शांत असणारे भैय्यू महाराज आत्महत्या का करतील? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. दरम्यान, या सगळ्या चर्चांनंतर भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. भैय्यू महाराज अंधश्रद्धेच्या विळख्यात अकडले होते. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, आत्महत्येपूर्वी काही दिवस भैय्यू महाराज प्रचंड तणावात होते. त्यांच्या शरिरात थकवा होता. या थकव्याला त्यांनी एक विकार मानलं होतं. हा विकार दूर करण्यासाठी त्यांनी चित्तौडगड (राजस्थान) मधील जादुटोणा करणारा बाबा मोहम्मद उर्फ बाबा साहब नावाच्या एका बाबाचा आसरा घेतला होता. याबद्दलची माहिती भैय्यू महाराज यांच्या जवळच्या व्यक्तींनाही नव्हती. मोबाइलवर तो बाबा आणि भैय्यू महाराज बोलायचे. जेव्हा राजस्थानमधील तो बाबा मध्य प्रदेशला यायचा तेव्हा एका बंद खोलीत ते भेटायचे. एका वर्षात दोन वेळा भैय्यू महाराज व तो बाबा भेटले होते. त्यावेळी तणावत असल्याचं भैय्यू महाराज यांनी त्या बाबाला सांगितलं होतं. दरम्यान, तणावाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं भय्यू महाराज यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं होतं. 

टॅग्स :आत्महत्याभय्यूजी महाराजपोलिस