नेरळच्या कोतवालवाडीत साकारलाय ‘भवताल’

By Admin | Updated: December 24, 2014 22:32 IST2014-12-24T22:32:38+5:302014-12-24T22:32:38+5:30

सिमेंटच्या जंगलात राहताना आजूबाजूचा निसर्गही टिकला पाहिजे, या उद्देशाने नेरळच्या कोतवाल वाडीत ‘भवताल’ पर्यावरण माहिती केंद्र साकारण्यात आले

'Bhavtal' in Kotwalwadi in Kerala | नेरळच्या कोतवालवाडीत साकारलाय ‘भवताल’

नेरळच्या कोतवालवाडीत साकारलाय ‘भवताल’

नेरळ : सिमेंटच्या जंगलात राहताना आजूबाजूचा निसर्गही टिकला पाहिजे, या उद्देशाने नेरळच्या कोतवाल वाडीत ‘भवताल’ पर्यावरण माहिती केंद्र साकारण्यात आले आहे. शेकडो विद्यार्थ्यांच्या हातून उमटलेल्या निसर्ग चित्रातून आपला निसर्ग कसा असला पाहिजे, पर्यावरण कसे संतुलित राहील, या विषयावर या मुलांनी पर्यावरण माहिती केंद्राच्या भिंती सजवल्या आहेत.
कोतवाल वाडीच्या संध्या देवस्थळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पर्यावरण माहिती केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. विशेष म्हणजे या केंद्राचे उद्घाटन हे ज्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण केंद्राच्या भिंती सजवल्या त्यांच्याच हस्ते करण्यात आले. हे माहिती केंद्र झाल्यानंतर या केंद्राच्या भिंती रंगवण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांचे हात पुढे आले. ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या पर्यावरण केंद्राचा रंगवलेल्या भिंती सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

Web Title: 'Bhavtal' in Kotwalwadi in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.