Join us

भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेचे आज होणार लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 06:04 IST

मांडवा येथे रो रो सेवेच्या रो पॅक्स टर्मिनलचे उद्घाटनही या वेळी होईल. या सेवेमुळे मुंबई ते अलिबाग प्रवास अवघ्या पाऊण तासात करता येईल.

बहुप्रतीक्षित रो रो सेवेची तयारी पूर्ण झाली असून ग्रीसहून आणलेल्या जहाजाची चाचणीदेखील यशस्वी झाली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रीय नौकावहन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेवेचे लोकार्पण केले जाईल.मांडवा येथे रो रो सेवेच्या रो पॅक्स टर्मिनलचे उद्घाटनही या वेळी होईल. या सेवेमुळे मुंबई ते अलिबाग प्रवास अवघ्या पाऊण तासात करता येईल. गेटवे आॅफ इंडिया ते मांडवादरम्यान वर्षाला सुमारे १५ लाख जण प्रवास करतात. मुंबई पोर्ट ट्रस्टने ३१ कोटी रुपये खर्च करून रो पॅक्स सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. रो पॅक्स प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने मांडवा येथे पायाभूत सुविधा विकसित केल्या. या कामांवर १३५ कोटी खर्च झाले असून, ३० मे २०१८ला ते पूर्ण झाले आहे. एकावेळी एक हजार प्रवासी आणि २०० गाड्या वाहून नेण्याची क्षमता या जहाजाची आहे. मांडवापर्यंतचा प्रवासाचा कालावधी ४५ मिनिटे ते १ तासाचा आहे. रो रो सेवेमुळे मुंबई ते अलिबाग प्रवास अवघ्या पाऊण तासात करता येईल. यामुळे कार्बन उत्सर्जन आणि रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होईल.

टॅग्स :मुंबई