भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाला गती द्यावी - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:48+5:302021-06-16T04:06:48+5:30

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाला गती देऊन विहित कालावधीत या स्मारकाचे काम ...

Bharat Ratna Dr. Work on Babasaheb Ambedkar's memorial at Indu Mill should be expedited - Dhananjay Munde | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाला गती द्यावी - धनंजय मुंडे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाला गती द्यावी - धनंजय मुंडे

Next

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाला गती देऊन विहित कालावधीत या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी तसेच पुतळा प्रतिकृती अंतिम करण्यासंदर्भातील गठित समितीचे लवकरच पुनर्गठन करण्यात येणार असल्याचेही मुंडे म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाचा आढावा दूरदृश्यप्रणालीव्दारे आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम, एम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, विभागाचे सचिव श्याम तागडे आदी अधिकारी बैठकीला उपस्थित होते. कोरोना स्थितीमुळे प्रकल्पाच्या कामांचा मूळ कालावधी वाढला आहे. त्यामुळे स्मारकाच्या कामांना गती देऊन ते विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले.

तर, इंदू मिल येथील स्मारक हे जागतिक दर्जाचे असणार आहे. हे लक्षात घेऊन काम दर्जेदार व्हावे यासाठी संबंधितांनी लक्ष द्यावे. तसेच कामाच्या सद्यस्थितीची माहिती दर्शनी भागात लावावी, अशा सूचना राज्यमंत्री कदम यांनी दिल्या.

यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी कामांची सद्यस्थितीसंदर्भात माहिती दिली. प्रवेशव्दार इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, स्मारक इमारत, बेसमेट वाहनतळ, स्मारक इमारत व पुतळा वगळता प्रकल्पाचे अंदाजित काम ४८ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही याबाबतही सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. स्मारकाचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्राधिकरण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मारक इमारत फाउंडेशनची सद्यस्थिती सचित्र माहितीसह यावेळी बैठकीत सादर करण्यात आली.

Web Title: Bharat Ratna Dr. Work on Babasaheb Ambedkar's memorial at Indu Mill should be expedited - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.