भांडुप मनसेत धुसफूस
By Admin | Updated: September 16, 2014 01:07 IST2014-09-16T01:07:40+5:302014-09-16T01:07:40+5:30
विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच भांडुपमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत धुसफूस सुरू झाली आहे.

भांडुप मनसेत धुसफूस
मुंबई : विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच भांडुपमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत धुसफूस सुरू झाली आहे. येथील माजी विभाग अध्यक्ष सतीश अधिकारी यांनी तर थेट फेसबुकवरून आमदार शिशिर शिंदे आणि अन्य पदाधिका:यांवर आरोपांच्या फैरी झाडत पाच वर्षामध्ये केलेल्या नवनिर्माणाचा हिशोब मागितला आहे.
अधिकारी यांनी फेसबुकच्या माध्यमातून ‘स्टेडियमची खेळपट्टी उखडणो सोपे आहे, पण स्टेडियम बांधणो आणि सांभाळणो फार कठीण,’ असा टोमणा शिंदेंना लगावला आहे. यासाठी त्यांनी भांडुप, टँकरोडवरील दोन एकरात वसलेल्या ‘कै. प्रमोद महाजन स्टेडियम’चा हवाला दिला आहे. सोबत या स्टेडियमच्या दुरवस्थेचे फोटोही अपलोड केले आहेत. तसेच ठाण्याच्या मनोरमानगरात लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून तयार झालेल्या मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सशी या स्टेडियमची तुलना करून हे इतर ठिकाणी होऊ शकते तर भांडुपमध्ये का नाही, असा सवालही विचारला आहे. अधिकारी यांनी अशा अन्य विषयांवर स्वपक्षाचे आमदार शिंदे यांना आरोपीच्या पिंज:यात उभे केले आहे. याशिवाय भांडुपमध्ये संघटना एकसंध नाही. पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते एकमेकांसोबतच लढत आहेत, एकमेकाचे पाय खेचत आहेत, अशीही टीका अधिकारी यांनी केली आहे.
याबाबत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मला याबाबत काहीही बोलायचे नाही. मी काय कामे केली हे भांडुपच्या जनतेला माहीत आहे. यंदाच्या निवडणुकीत त्याच कामाचा विचार करून जनता मतदान करेल.अधिकारी यांची भूमिका वैयक्तिक असावी, अशी प्रतिक्रिया भांडुप मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश सावंत यांनी व्यक्त केली. गेल्या निवडणुकीत शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार सुनील राऊत, आघाडीचे शिवाजीराव नलावडे यांचा पराभव केला होता. मात्र यंदा प्रत्यक्ष लढतीला सामोरे जाण्याआधी त्यांना पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागेल, अशी चर्चा आहे. (प्रतिनिधी)
च्‘स्टेडियमची खेळपट्टी उखडणो सोपे आहे, पण स्टेडियम बांधणो आणि सांभाळणो फार कठीण,’ असा टोमणा मनसे विभाग अध्यक्ष सतीश अधिकारी यांनी फेसबुकच्या माध्यमातून शिंदेंना लगावला आहे. यासाठी त्यांनी भांडुप, टँकरोडवरील दोन एकरात वसलेल्या ‘कै. प्रमोद महाजन स्टेडियम’चा हवाला दिला आहे. सोबत या स्टेडियमच्या दुरवस्थेचे फोटोही अपलोड केले आहेत.