भालचंद्र पेंढारकर कालवश
By Admin | Updated: August 12, 2015 04:42 IST2015-08-12T04:42:56+5:302015-08-12T04:42:56+5:30
‘ललितकलादर्श’ या नाट्यसंस्थेचे धुरीण आणि मराठी संगीत रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असलेले नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचे मंगळवारी सकाळी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले.

भालचंद्र पेंढारकर कालवश
- संगीत रंगभूमीवर शोककळा
मुंबई : ‘ललितकलादर्श’ या नाट्यसंस्थेचे धुरीण आणि मराठी संगीत रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असलेले नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचे मंगळवारी सकाळी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. ‘ललितकलादर्श’चा तेज:पुंज चंद्र काळाच्या पडद्याआड गेल्याचे वृत्त थडकताच संगीत रंगभूमीवर शोककळा पसरली.
भालचंद्र पेंढारकर यांना काल (सोमवारी) दादर टी.टी. येथील कृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान आज (मंगळवार) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या माटुंगा येथील निवासस्थानी आणले गेले आणि त्यानंतर दुपारी १२.३० वाजता त्यांचे पार्थिव यशवंत नाट्यगृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दुपारी शीव स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीत रंगभूमीवरचा भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना त्यांच्या निधनाने नाट्यसृष्टीत व्यक्त होत आहे.