भागवतांनी संघ मुख्यालयात इफ्तार पार्टी ठेवावी, नवाब मलिक यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:03 IST2018-06-05T01:03:55+5:302018-06-05T01:03:55+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इफ्तार पार्टी करावीशी वाटत असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरला संघाच्या मुख्यालयात इफ्तार पार्टी ठेवावी, आम्हाला तेथे बोलवावे आम्ही आनंदाने संघाच्या मुख्यालयात इफ्तार पार्टीसाठी जाऊ, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला.

 Bhagwat should keep Iftar party at the Sangh headquarters, Nawab Malik criticized | भागवतांनी संघ मुख्यालयात इफ्तार पार्टी ठेवावी, नवाब मलिक यांची टीका

भागवतांनी संघ मुख्यालयात इफ्तार पार्टी ठेवावी, नवाब मलिक यांची टीका

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इफ्तार पार्टी करावीशी वाटत असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरला संघाच्या मुख्यालयात इफ्तार पार्टी ठेवावी, आम्हाला तेथे बोलवावे आम्ही आनंदाने संघाच्या मुख्यालयात इफ्तार पार्टीसाठी जाऊ, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला.
संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचच्यावतीने सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. विदेशी दुतावासांना बोलावण्यात आले आहे. त्यांनी भारतातील लोकांना बोलवायला हवे होते.
सरकारी अतिथीगृहामध्ये इफ्तार ठेवत आहेत. लग्न लावत आहेत.
पण आम्ही इफ्तारला विरोध करत नाही. कारण यानिमित्ताने संघाचे
जर हदय बदलत असेल,
तर सरसंघचालक मोहन भागवत
यांनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही इफ्तार पार्टीचे आयोजन करावे
आम्ही स्वागतच करु, असेही मलिक म्हणाले.

Web Title:  Bhagwat should keep Iftar party at the Sangh headquarters, Nawab Malik criticized