Join us  

भाग सेना भाग.... लेखिका शोभा डे यांनी ट्विटरहून साधला शिवसेनेवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 8:35 PM

कंगना आणि शिवसेना वादात भाजपा नेत्यांनी कंगनाच्या बाजुने खिंड लढवल्याचे पाहायला मिळत आहे. तर, रिपाइं नेते केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही कंगनाची बाजू घेत, तिला नुकसानभरपाई देण्यासंदर्भात राज्यपालांकडे चर्चा केली आहे.

मुंबई -  मुंबईत सुरू असलेल्या कंगना राणौत आणि शिवसेनेमधील वादाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने करवाई केल्यानंतर आता कंगनाविरोधात ड्र्ग्स केसची चौकशीही होणार आहे. याच दरम्यान या प्रकरणी आता विश्व हिंदू परिषदेनं कंगनाची बाजू घेतली आहे. अयोध्येतील संतांनी कंगनाचं समर्थन केलं असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर, लेखिका शोभा डे यांनीही शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. 

कंगना आणि शिवसेना वादात भाजपा नेत्यांनी कंगनाच्या बाजुने खिंड लढवल्याचे पाहायला मिळत आहे. तर, रिपाइं नेते केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही कंगनाची बाजू घेत, तिला नुकसानभरपाई देण्यासंदर्भात राज्यपालांकडे चर्चा केली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनीही कंगनावरुन शिवसेनेला लक्ष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. या वादावरून अख्खी सरकारी यंत्रणा कंगनाशी लढण्यासाठी उतरली आहे. आता कोरोनाशी लढणे संपले असून कंगनाशी लढाई सुरु आहे, असे म्हणत फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आता, वादग्रस्त लेखिका शोभा डे यांनीही ही संधी साधत शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. 

शोभा डे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाग सेना.. भाग.. असे ट्विट केलंय. 

राहुल गांधींवरही केली होती टीका 

काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पक्ष नेतृत्त्वाबद्दल लिहिलेल्या पत्रानं बैठकीत घमासान सुरू आहे. या पत्राच्या 'टायमिंग'वर बोट ठेवत राहुल यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांबद्दल संताप व्यक्त केला. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याचा अतिशय गंभीर आरोप राहुल यांनी केला होता. त्यानंतर, शोभा डे यांनी राहुल गांधींवर बोचऱ्या शब्दात टीका केली होती.  शोभा डे यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांना मोठ्ठा होण्याची सूचना केली आहे. 'राहुल बाबा, मोठ्ठा हो... अपरिपक्वपणालाही काही मर्यादा असतात', ही तुमची ड्रॉईंग रुम नाही, असे शब्द शोभा डे यांनी वापरले आहेत. राहुल गांधीच्या समजदारपणावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  शोभा डे यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :शिवसेनाशोभा डेकंगना राणौत