Join us  

बेस्टची दररोजची कमाई दोन कोटी; प्रवाशांकडून होत नाही नियमांचे पालन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 7:48 AM

लोकल बंद असल्याने मुंबईकरांना घ्यावा लागतोय बसचा आधार

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचा प्रवास सर्वांसाठी खुला नाही. बेस्ट बस मुंबईतील दळणवळणाचे एक मुख्य साधन आहे. यामुळे बेस्ट बसला प्रवासी गर्दी करत आहेत. बेस्ट वाहतूक आता रुळावर आली आहे. दररोज २२ लाख जण बेस्टने प्रवास करत असून दोन कोटींचे उत्पन्न मिळत आहे. २० मार्च रोजी २० लाख प्रवासी बेस्टने प्रवास करत होते, तर एक कोटी १७ लाखांचे उत्पन्न मिळत होते. 

मुंबईत कोरोनाचा संसर्ग सध्या वाढत आहे. गर्दी टाळणे हा त्यावर प्रभावी उपाय असल्याने अनलॉक झाल्यानंतरही मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे बेस्ट बसची गर्दी वाढत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा होती. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट बसची सेवा जूनपासून सुरू करण्यात आली आहे.. तर ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने बेस्ट प्रवासाची मुभा देण्यात आली होती. बेस्ट बसमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रवास केला जावा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

दररोज होतेय सिटी बसचे सॅनिटायझेशनशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार बेस्ट बसचे दररोज निर्जंतुकीकरण प्रत्येक प्रवासी फेरीनंतर करण्यात येत आहे. प्रवाशांच्या काळजीसाठी सर्व व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हणमंत गोफणे यांनी सांगितले. 

फिजिकल डिस्टन्सचा उडतोय बोजवारामुंबईत बेस्ट बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने प्रवासी बसचा वापर करीत आहेत. सकाळी कामाला जाण्याच्या वेळी तसेच संध्याकाळी कामावरून सुटण्याच्या वेळी प्रवासी जास्त असतात. यावेळी सोशल डिस्टन्सची अडचण होत आहे. एकाच वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येतात.

रिक्षापेक्षा परवडतो बसचा प्रवासबेस्ट बसला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना किलोमीटरनुसार भाडे घेण्यात येते. त्यातही पाच किमीसाठी ५ रुपये आकारण्यात येतात. तर याच अंतरासाठी रिक्षाने ६० ते ६५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे असंख्य नागरिक रिक्षाऐवजी बसला प्राधान्य देत आहेत.  ३२०० बस धावतातजूनपासून सर्वांसाठी बस सुरू करण्यात आल्यानंतर बसची संख्या वाढवण्यात आली. जूनपूर्वी ४०० बस धावत होत्या, मात्र आता ही संख्या ३२०० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईबेस्ट