Join us  

महिनाभरात बेस्टचे प्रवासी सव्वानऊ लाखांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 6:35 AM

भाडेकपातीचा फायदा; उत्पन्नातील घट २२ लाखांनी झाली कमी

मुंबई : बस भाड्यातील कपातीचा मोठा फायदा आता बेस्ट उपक्रमाला होऊ लागला आहे. गेल्या महिनाभरात तब्बल सव्वानऊ लाख प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे उत्पन्नातील घट २० ते २२ लाख रुपयांनी कमी झाली आहे. १७ लाखांवर आलेली बेस्ट उपक्रमाची प्रवासी संख्या आता सुमारे २७ लाखांवर पोहोचली आहे.

महापालिकेच्या अटीनुसार बेस्ट उपक्रमाने ९ जुलैपासून प्रवासी भाडे किमान पाच ते कमाल २० रुपये केले. एवढेच नव्हे, तर तीन नवीन वातानुकूलित बस मार्ग, तिकीट कपातीचे मार्केटिंग बेस्ट उपक्रमाने सुरू केले आहे. याचे चांगले परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. शेअर रिक्षाच्या रांगेत उभे राहणारे मुंबईकर आता बस थांब्यांवर गर्दी करत आहेत. भाडेकपातीच्या पहिल्याच दिवशी बेस्ट बसगाड्यांमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या सरासरी १७ लाख प्रवाशांमध्ये पाच लाखांनी भर पडली होती. त्यानंतर, दररोज प्रवासी संख्येत वाढ होत गेली.भाडे कपात करण्यात आल्यामुळे १ आॅगस्ट रोजी प्रवासी संख्या २६ लाख ४५ हजारांवर पोहोचली. यामुळे उत्पन्नातील घटही ६६ लाखांवरून आता ४४ लाखांवर आली आहे.पूर्वीचीप्रवासी संख्या17,00,000आताचीप्रवासी संख्या27,00,000१ आॅगस्ट

प्रवासी2645425उत्पन्न (")1,68,14,132 

टॅग्स :बेस्टमुंबई