रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद
By Admin | Updated: July 4, 2015 23:20 IST2015-07-04T23:20:21+5:302015-07-04T23:20:21+5:30
लोकमत आणि युवा फोर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त वसई येथील समाज उन्नती मंडळ

रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद
वसई : लोकमत आणि युवा फोर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त वसई येथील समाज उन्नती मंडळ सभागृहात आयोजलेल्या रक्तदान शिबिरात ५४ बाटल्या रक्त संकलन झाले. या शिबिरास खास करून तरुणाईकडून उत्तम प्रतिसाद लाभला. यावरून आजच्या तरुणाईला रक्तदानाचे महत्व पटल्याचेही स्पष्ट झाले. या कार्यक्रमास नवनिर्वाचित युवा नगरसेवक हार्दीक राऊत, कल्पेश, मानकर, समाजसेवक अजित चाको आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमास वसईतील समृद्धी सेवा संस्था युवा स्टेला ग्रुप यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)