बेस्ट बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:07 IST2021-08-13T04:07:33+5:302021-08-13T04:07:33+5:30

मुंबई : बेस्टच्या बसमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री हा प्रकार गोरेगाव पश्चिम येथे घडला असून, वनराई ...

Best passenger dies after falling from bus | बेस्ट बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

बेस्ट बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

मुंबई : बेस्टच्या बसमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री हा प्रकार गोरेगाव पश्चिम येथे घडला असून, वनराई पोलिसांनी याप्रकरणी बसचालकाला अटक करत सीसीटीव्ही पडताळणी व अन्य तांत्रिक तपास सुरू केला आहे. उदय माने असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे.

गोरेगाव स्टेशन रोड हा वर्दळीचा परिसर आहे. गोरेगावच्या यशवंत नगरमध्ये राहणारे वसंत घोले (५५) हे बस पकडण्यासाठी धावले आणि बसच्या मागच्या चाकाखाली आले. ज्यात चिरडून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष अवती यांनी सांगितले की, आम्ही घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. मात्र, त्यातून नेमके काय घडले, ते स्पष्टपणे दिसत नाही. घोले गाडीतून पडले की आधीच चाकाखाली आले, याबाबत काही स्पष्ट होत नाही. मात्र, बस वेगात नव्हती आणि अपघातानंतर चालकाने लगेच बस थांबवल्याचेही दिसत आहे. वनराई पोलीस अधिक तपास करत असून, प्रत्यक्षदर्शींचा जबाब घेतला जाणार आहे.

Web Title: Best passenger dies after falling from bus