बेस्टचे नवे चार मार्ग
By Admin | Updated: November 29, 2015 03:11 IST2015-11-29T03:11:22+5:302015-11-29T03:11:22+5:30
डिसेंबर महिन्यापासून बेस्टच्या वतीने नवे चार मार्ग सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये दादरमधील प्लाझा ते प्रतिक्षा नगर आगार (१७५), मालाड ते सीप्झ बसस्थानक (४५७), प्रबोधनकार

बेस्टचे नवे चार मार्ग
मुंबई : डिसेंबर महिन्यापासून बेस्टच्या वतीने नवे चार मार्ग सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये दादरमधील प्लाझा ते प्रतिक्षा नगर आगार (१७५), मालाड ते सीप्झ बसस्थानक (४५७), प्रबोधनकार ठाकरे नगर बसस्थानक ते बोरीवली स्थानक पश्चिम (२०६) आणि सांताक्रूझ आगार ते टाटा पॉवर स्टेशन (३५६) या मार्गांचा समावेश आहे.
१ डिसेंबरपासून नवे बेस्ट मार्ग कार्यान्वित होणार आहेत. काही बस मार्गांचा विस्तारही करण्यात येणार आहे. काही बसमार्ग वळविण्यात आले आहेत. ज्या बस मार्गांना अत्यल्प प्रतिसाद आहे, असे बस मार्ग बंद करण्यात येणार आहेत. ज्या बसमार्गांचा विस्तार करण्यात येणार आहे, त्यामध्ये ७४, ७९, २०२, ३२१, ७१, ७८, ५०२ या बसक्रमांकाचा समावेश आहे. ज्या बसमार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहे, त्यामध्ये ५०, २८३, २११, २१२, ३९३, ४७९, ५१० या बसक्रमांकाचा समावेश आहे. जे बसमार्ग रद्द करण्यात येणार आहेत, त्यामध्ये २५०, २९९, ४२७, ७०६ या बसक्रमांकाचा समावेश आहे. शिवाय ६२९ आणि ६३३ या दोन बसमार्गांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे, असे बेस्टतर्फे स्पष्ट करण्यात आले.