Join us  

बेस्टच्या ताफ्यात १,२५० नव्या बसेस; भाडेतत्त्वावरही गाड्या घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 3:37 AM

प्रवाशांची प्रतीक्षा संपणार

मुंबई : महापालिकेकडून आर्थिक साह्य मिळाल्यांनतर अटीनुसार बेस्ट उपक्रमाने भाडेकपातीनंतर बसगाड्यांची संख्याही वाढविण्यास सुरुवात केली आहे. यापैकी चारशे नव्या मिडी वातानुकूलित बसगाड्या घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर, आता आणखी १,२५० बसगाड्यांचा ताफा बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांची बस थांब्यावरील प्रतीक्षा संपणार आहे.बसभाड्यात कपात केल्यानंतर प्रवासीवर्ग बेस्ट उपक्रमाकडे वळला. बसगाड्यांच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना बस थांब्यावर वाट पाहत उभे राहावे लागते. बसगाड्यांचा ताफा सहा हजारांपर्यंत नेण्याचा निर्धार बेस्ट प्रशासनाने केला आहे. त्यानुसार, भाडेतत्त्वावर बसगाड्या घेण्यात येत आहेत. यांपैकी पहिल्या चारशे वातानुकूलित बसगाड्या घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर, वातानुकूलित मिनी आणि मिडी बसगाड्या प्रत्येकी पाचशे, अडीचशे इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाड्या घेण्यात येणार आहेत.त्याचबरोबर, मुंबई रेल्वे विकास महामंडळांकडून एकात्मिक तिकीट प्रणालीसंदर्भात पुढाकार घेण्यात आला आहे. यामध्ये बेस्ट उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या तिकीट प्रणालीचा प्रयोग काही ठरावीक बसमार्गांवर करण्यात येणार आहे.या प्रयोगाचे यश-अपयश पाहून ही तिकीट प्रणाली अन्य सर्व बसमार्गांवर लागू करण्यात येईल. यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर-हार्डवेअर तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येत आहे. त्यानंतर, टप्प्याटप्याने या बसगाड्या ताफ्यात दाखल होतील, असे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले.बेस्टचे भाडे कमी झाले; प्रवासी संख्या वाढली, पण बस आगारात पडूनबेस्ट बसचे भाडे कमी करण्यात आले. भाडे कमी झाल्याने प्रवाशांची संख्याही वाढली. मात्र, आता बेस्ट बसफेºया कधी वाढणार, असा सवाल प्रवासी करत आहेत़ बेस्टच्या ताफ्यातील ३ हजार २०० बस चालविण्यासाठी २ हजार ७८२ चालकांची आणि २ हजार ६१७ वाहकांची आवश्यकता आहे. एकूण बसगाड्यांपैकी फक्त २ हजार ८१८ गाड्या चालू आहेत. उर्वरित बस कामगार कमी असल्यामुळे आगारात पडून आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होतेय. सर्व बसगाड्या रस्त्यांवर नसल्यामुळे प्रवाशांच्या रांगाच-रांगा बसथांब्यावर लागतात.मुंबईतले बंद करण्यात आलेले ८० मार्ग अजूनही सुरू करण्यात आले नाहीत. १० लाख लोकांमागे १,२०० बस तत्त्वाप्रमाणे एक कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईला १५ हजार ६०० बसची गरज आहे. त्याऐवजी फक्त ३ हजार २०० बसचा ताफा आणि रस्त्यांवर फक्त २ हजार ८१८ बस आहेत. सुमारे १२ हजार ५०० अधिक बसची आवश्यकता आहे. या बस आणाव्यात आणि त्यांच्या पार्किंगसाठी बेस्ट डेपोच्या जागा राखीव ठेवाव्यात, अशी मागणी ‘आमची मुंबई आमची बेस्ट’ मंचाकडून करण्यात आली आहे.बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण करा. विकासकांकडे थकीत असलेली ३२० कोटींची रक्कम वसूल करा. ‘शिवशाही’ एसटीच्या भाडेतत्त्वाचा फसलेला प्रयोग बेस्टमध्ये आणू नका. आवश्यक असलेल्या बेस्ट बस आणून चालक व वाहकांची भर्ती करा. लाखो प्रवाशांना घेऊन जाणाºया बससाठी रस्त्याची एक लेन आरक्षित ठेवा, व त्याची सक्तीने अंमलबाजवणी करा; ज्यामुळे बसचा वेग वाढेल इत्यादी मागण्या ‘आमची मुंबई आमची बेस्ट’ मंचाने केल्या आहेत.

टॅग्स :बेस्ट