Join us  

बेस्टचे किमान भाडे 5 रुपये? 64% प्रवाशांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 1:40 AM

आज प्रस्ताव मंजुरीसाठी मांडणार

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपए अनुदान देण्यास स्थायी समितीने नुकताच हिरवा कंदिल दाखविला. त्यानुसार उर्वरित रक्कमेसाठी महापालिका प्रशासनाच्या अटीनुसार बेस्ट उपक्रम किमान बसभाड्यात कपात करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारच्या बैठकीत मंजुरीसाठी बेस्ट प्रशासनाने मांडला आहे. याप्रमाणे बेस्टचे किमान भाडे आठ रूपयांवरून पाच रुपए होणार आहे. याचा फायदा ६४ टक्के प्रवाशांना होणार आहे.पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची तयारी दाखविली. त्यानुसार सहाशे कोटी रुपए अनुदान जाहीर करण्यात आले आहे. मात्र यापैकी शंभर कोटी रुपएचं पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहेत. तर उर्वरित पाचशे कोटींसाठी आयुक्तांनी बेस्ट प्रशासनापुढे काही अटी ठेवल्या आहेत. कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासनामध्ये गेल्या आठवड्यात सामंजस्य करार झाल्याने भाड्याने बस घेण्याचा प्रस्ताव मार्गी लागला.अटींचे पालन न केल्यास पुढचे अनुदान रोखण्याच येईल, असे आयुक्तांनी ठणकावले आहे. त्यामुळे कमी अंतराचे भाडे पाच रुपए करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने तयार केला आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत शुक्रवारी हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. घर ते रेल्वे स्थानक या मार्गावर बहुसंख्य प्रवाशी प्रवास करतात. त्याचे निद्यमान भाडे आठ रुपए आहे. ते पाच रुपए करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र यातून होणारे फायदे-तोटे स्पष्ट करण्यात आलेले नाही.अशा आहेत काही अटी...भाडे तत्वावर टप्यटप्याने डिझेल, सीएनजी, इलेक्ट्रिकवर चालणा-या सात हजार बस गाड्यांचा ताफा तयार करावा.थांब्यावर बसगाड्यांचे आगमन व प्रस्थानाची वेळ असावी. आॅक्टोबर 2019 पर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्यात यावी.प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न. तीन महिन्यांत भाड्याने घेतलेल्या बसगाड्यांचा ताफा सात हजारपर्यंत वाढवून त्याबाबत अहवाल सादर करावा.यासाठी करणार भाडेकपात....बेस्ट बसगाड्यांमधून दररोज 25 लाख प्रवाशी प्रवास करतात. ही संख्या यापूर्वी तब्बल 43 लाख एवढी होती. प्रवासी भाडे कमी केल्यानंतर कमी अंतरावरील प्रवासी संख्या वाढेल, असा पालिकेला विश्वास वाटतो. भाडेकपातीचा फायदा सुमारे 16 लाख प्रवाशांना होईल, असा अंदाज बेस्टमधील सुत्रांनी व्यक्त केला.बस थांब्यावरील प्रतीक्षा संपणारबस भाड्याने घेताना 3337 बसचा ताफा आणि कामगारकपात करण्यात येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर भाडेकरारावरील बसगाड्यांमुळे बेस्टचा ताफा वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांची बस ताफ्यावरील प्रतीक्षा संपणार आहे.१२०० कोटी रुपयांची मागणी - गटनेत्यांच्या बैठकीत दरमहा १०० कोटी प्रमाणे 12 महिन्यांसाठी १२०० कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र आता ६०० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. १२०० कोटी रुपये दिले असते तर बेस्ट उपक्रमाला सुधारणा आणि आराखडा चांगल्या प्रकारे करता आल्या असत्या, असे मत विरोधी पक्षाने व्यक्त केले.

टॅग्स :बेस्ट