बेस्टचा संप अटळ? मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:19 IST2017-08-06T04:19:07+5:302017-08-06T04:19:32+5:30

बेस्टच्या संपाचा तिढा सोडविण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मध्यस्थीची विनंती केली आहे. या विनंतीनुसार रविवारी याप्रश्नी बैठक होणे

Best of luck? Chances of the occurrence of Mumbaiites | बेस्टचा संप अटळ? मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता

बेस्टचा संप अटळ? मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता

मुंबई : बेस्टच्या संपाचा तिढा सोडविण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मध्यस्थीची विनंती केली आहे. या विनंतीनुसार रविवारी याप्रश्नी बैठक होणे अपेक्षित आहे. परंतु रविवारी ही बैठक झाली नाही तर मात्र बेस्टचा संप होणे अटळ असून, ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.
महापौर दालनात पाच वेळा बैठका होऊनही बेस्टला आर्थिक मदत देण्याची मागणी रखडली आहे. बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दुसºया दिवशी करावा, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, महापालिकेने बेस्टला दिलेले कर्ज अनुदान जाहीर करावे, पालिका आकारत असलेल्या विविध करातून सूट मिळावी, बेस्ट उपक्रमाची सर्व जबाबदारी पालिकेने घ्यावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्टच्या १२ युनियनच्या कृती समितीने मंगळवारपासून उपोषण सुरू केले होते. तीन दिवस उपोषण सुरू असले तरी महापालिका किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने संपकºयांची भेट घेतलेली नाही. याच दरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने गुरुवारी उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान, ७ आॅगस्टपासून बेस्ट कर्मचारी वर्गाने संपाचा इशारा दिला आहे.

Web Title: Best of luck? Chances of the occurrence of Mumbaiites