बेस्टचा बसपास झाला स्वस्त!
By Admin | Updated: September 16, 2015 00:08 IST2015-09-16T00:08:22+5:302015-09-16T00:08:22+5:30
बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सोयीसाठी स्मार्ट कार्डच्या मदतीने बसपास योजना सुरू केली आहे. त्यानुसार दैनंदिन पाससाठी शहरात ४० रुपये, उपनगरात ५० रुपये आणि मुंबईबाहेरील

बेस्टचा बसपास झाला स्वस्त!
मुंबई : बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सोयीसाठी स्मार्ट कार्डच्या मदतीने बसपास योजना सुरू केली आहे. त्यानुसार दैनंदिन पाससाठी शहरात ४० रुपये, उपनगरात ५० रुपये आणि मुंबईबाहेरील प्रवासासाठी ७० रुपये आकारले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे आजपासून (१६ सप्टेंबर) हे दर लागू होणार आहेत. पूर्वी दैनंदिन पासचे दर सरसकट ७० रुपये होते.
बेस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्य:स्थितीमध्ये शहर आणि उपनगरातील प्रवासाकरिता वेगवेगळे पास नाहीत; तर एकच सामायिक पास आहे. शिवाय
१२ वर्षांखालील मुलांकरिता सवलतीचे दैनंदिन बसपासदेखील उपलब्ध नव्हते. याचा सारासार विचार करीत १६ सप्टेंबरपासून शहर आणि उपनगराकरिता वेगवेगळ्या दराचे बसपास आणि १२ वर्षांखालील मुलांना दैनंदिन सवलतीचे बसपास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच रविवार आणि सार्वजनिक सुट्टीदिवशीही स्मार्ट कार्डशिवाय दैनंदिन बसपास घेऊन इच्छितस्थळी प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
बसचा दैनंदिन पास
विभागप्रौढबालकप्रौढप्रौढ
दैनंदिनदैनंदिनमासिकत्रैमासिक
शहर४०२०९७५२,८२५
उपनगर५०२५१,२००३,४७५
मुंबईबाहेर७०३५१,७००५,०४०
एसी बस२००१००४,८००१४,४००