बेस्टला मिळणार ३०३ बस
By Admin | Updated: March 16, 2017 00:18 IST2017-03-16T00:18:23+5:302017-03-16T00:18:23+5:30
बेस्टच्या ताफ्यात एप्रिल अखेर ३०३ नवीन बसेचचा समावेश होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे.

बेस्टला मिळणार ३०३ बस
मुंबई : बेस्टच्या ताफ्यात एप्रिल अखेर ३०३ नवीन बसेचचा समावेश होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे.
या ३०३ गाड्यांपैकी ११५ गाड्या मार्च महिन्यात तर उर्वरित १८८ गाड्या एप्रिल अखेरीस बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट होतील असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितले आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात असणा-या बसगाड्यांपैकी ३०० बसगाड्या भंगारात काढण्यात येणार असल्याने प्रवासी वाहतुकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने यासंदर्भात पुढी कार्यवाही करण्याबाबतचा तारांकित प्रश्न काँग्रेसचे भाई जगताप यांनी उपस्थित केला होता.
यावरील लेखी उत्तरात मुंख्यमंत्र्यांनी सांगितले की, टाटा मोटर्स लिमिटेड ला ३०३ नवीन बस पुरविण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ४ मार्च २०१६ रोजी खरेदी आदेश दिले होते. बसगाड्यांचा तातडीने पुरवठा करण्याचे टाटा मोटर्सला कळविण्यात आले असून मार्च २०१७ अखेरपर्यंत ११५ मिळणार आहेत. (प्रतिनिधी)