मेगाब्लॉकमध्ये बेस्ट बस सेवा
By Admin | Updated: December 20, 2014 01:23 IST2014-12-20T01:23:09+5:302014-12-20T01:23:09+5:30
मध्य रेल्वे मार्गावर उद्या रात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे़

मेगाब्लॉकमध्ये बेस्ट बस सेवा
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर उद्या रात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे़ त्यामुळे या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी उद्या मध्यरात्रीही फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बसगाड्या बेस्ट उपक्रमामार्फत सोडण्यात येणार आहेत़
उद्या रात्री १० वाजून ५० मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून शेवटची लोकल सुटणार आहे़ सीएसटी ते कल्याण एसी विद्युत प्रवाहाची चाचणी होणार असल्याने रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी सव्वासहा वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही़ याचा फटका कार्यालयातून रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे़ त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार ७ मर्यादित, ३६८ मर्या़, २७ व ३०२ मर्या़ या मार्गांवर जादा बसगाड्या
रात्री सव्वाअकरापासून सुटणार
आहेत़ (प्रतिनिधी)