Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिलकीच्या बजेटसाठी ‘बेस्ट’चा गोलमाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 06:19 IST

मुंबई : सादर केला आहे. मात्र तुटीत असताना बेस्ट प्रशासनाने अर्थसंकल्पात शिल्लक दाखविण्यासाठी खोटे आकडे दाखविले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन या अर्थसंकल्पाचा बारकाईने अभ्यास करून हा आकड्यांचा खेळ शोधून काढणार आहे.सन २०१७-२०१८ मध्ये बेस्ट अर्थसंकल्पात ५९० कोटी रूपयांची तूट होती. त्यामुळे बेस्टने तुटीचा अर्थसंकल्प महापालिकेकडे पाठविला होता. पालिका प्रशासनाने मात्र हा अर्थसंकल्प बेस्ट प्रशासनाकडे परत पाठवून सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यास सांगितले होते. पालिकेकडे आर्थिक मदत मागणाºया बेस्ट उपक्रमाला काटकसर करून बचत करण्याचा सल्ला पालिका प्रशासनाने दिला होता. परंतु बेरीज कमी आणखी वजाबाकीच जास्त असल्याने बेस्ट प्रशासनाला आर्थिक गणित काही जुळवता आले नाही. बेस्टने हे एक लाख नफा दाखविण्यासाठी दोन हजार कोटी रुपये घसारा खात्यातील शिल्लक असे दाखविल्याचे समजते. म्हणजेच ही रक्कम बेस्टच्या बँक खात्यात आहे, असा त्याचा अर्थ होतो. मात्र या खात्या अंतर्गत अशी कोणतीही रक्कम बँकेत नाही. हे अत्यंत गंभीर असल्याने पालिका आयुक्त याकडे लक्ष देऊन अर्थसंकल्पाची छाननी करणार आहेत. पालिका महासभेच्या मंजुरीनंतर हा अर्थसंकल्प आयुक्तांच्या शेºयासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यावेळेस हा घोळ समोर येईल, असे अधिकारी सांगतात.आगामी वर्षातील उत्पन्न वाढवून दाखविलेबेस्ट उपक्रमात ३८०० बसगाड्यांचा ताफा आहे.बेस्टच्या बसगाड्यांमधून दररोज २८ लाख प्रवासी प्रवास करतात. दहा वर्षांपूर्वी हा आकडा ४२ लाख होता.अर्थसंकल्पात ३४० कोटी रुपये अनुदान स्वरूपात दाखविण्यात आले आहेत. मात्र ही रक्कम अनुदान म्हणून दाखविण्यास आयुक्तांचा विरोध आहे. यामुळे बेस्ट अडचणीत येऊ शकते.प्रस्तावित भाडेवाढ फुगवून आगामी वर्षातील उत्पन्न वाढवून दाखविले असल्याचा संशय पालिका प्रशासनाला आहे.

टॅग्स :बेस्ट