सुकन्या योजनेला लाभार्थी मिळेना
By Admin | Updated: July 26, 2014 23:14 IST2014-07-26T23:14:07+5:302014-07-26T23:14:07+5:30
मुलींचा जन्मदर वाढावा, बालविवाह रोखले जावेत या हेतूने राज्यशासनाने सुकन्या योजना राबवण्याचा निर्णय घेतला.

सुकन्या योजनेला लाभार्थी मिळेना
मोखाडा ग्रामीण : मुलींचा जन्मदर वाढावा, बालविवाह रोखले जावेत या हेतूने राज्यशासनाने सुकन्या योजना राबवण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात 1 जानेवारी 2क्14 पासून योजना सुरू झाली आहे, मात्र पुरेशा जनजागृतीअभावी या योजनेचा तालुक्यात बोजवारा उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बराचसा कालावधी उलटूनही या योजनेसाठी पात्र लाभार्थी मात्र मिळालेले नाहीत.
मुलींच्या कल्याणासाठी महिला व बाल विकास विभागाने सुरू केलेल्या या योजनेत उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतुद करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ सर्व गटातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबात जन्मणा:या प्रत्येक मुलींसाठी असून एका कुटूंबातील फक्त दोनच अपत्याकरिता योजनेचा लाभ घेता येणार आहे. अंगणवाडीसेविका अथवा बाल विकास प्रकल्प अधिका:यांकडे अर्ज करता येईल.
या योजने अंतर्गत आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणा:या केंद्र शासन आम आदमी विमा योजने अंतर्गत या मुलींच्या नावे जमा केलेल्या रकमेतून नाममात्र 1क्क् रूपये हप्ता जमा करून मुलींच्या पालकांचा विमा हीउतरवला जातो असे असताना देखील जनजागृतीअभावी या योजनेचा तालुक्यात बट्टय़ाबोळ झाला आहे. या योजनेत अनेक किचकट अटींचा समावेश असल्याचे मुख्य सेविका वाडीले यांनी सांगितले. (वार्ताहर)
दारिद्रय़रेषेखालील जन्मणा:या प्रत्येक मुलींच्या नावे योजनेअंतर्गत 1 वर्षाच्या आत 21 हजार 2क्क् रूपये आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत जमा केले जातील. 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 1 लाख रूपये प्रदान करण्यात येतील.