अन्नसुरक्षेचे लाभार्थी वाढले

By Admin | Updated: May 22, 2014 03:19 IST2014-05-22T03:19:40+5:302014-05-22T03:19:40+5:30

या लाभापासून वंचित असलेल्या एक लाख २१ हजार २४९ दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) कुटुंबांना या महिन्यापासून प्रति किलो नऊ रुपये ६० पैसे दराने अन्नधान्य मिळणार आहे.

Beneficiaries of food security increased | अन्नसुरक्षेचे लाभार्थी वाढले

अन्नसुरक्षेचे लाभार्थी वाढले

सुरेश लोखंडे , ठाणे - राष्ट्रीय अन्नसुरक्षा विधेयकानुसार जिल्ह्यातील सुमारे ४७ लाख ९२ हजार ६५० लाभार्थ्यांसह अंत्योदय योजनेच्या सुमारे एक लाख ९३ हजार ५१२ लाभार्थ्यांना सवलतीनुसार अन्नधान्यचा लाभ दिला जात आहे. परंतु या लाभापासून वंचित असलेल्या एक लाख २१ हजार २४९ दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) कुटुंबांना या महिन्यापासून प्रति किलो नऊ रुपये ६० पैसे दराने अन्नधान्य मिळणार आहे. राष्टÑीय अन्नसुरक्षा विधेयकासाठी जिल्ह्यातील प्राधान्यक्रमाचे १८ लाख ९७ हजार २९० लाभार्थी प्रस्तावित करण्यात आले होते. यापैकी १७ लाख सात हजार ३०५ कुटुंबांना या सवलतीच्या अन्नधान्याचा लाभ दिला जात आहे. उर्वरित एक लाख ८९ हजार ९८५ कुटुंबे या सवलतीच्या अन्नधान्यापासून वंचित होती. त्यापैकी या महिन्यापासून एक लाख २१ हजार २४९(एपीएल) कुटुंबांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. या कुटुंबाना प्रतिकिलो नऊ रुपये ६० पैसे दराने तांदूळ व गहू दिले जाणार आहे. यानुसार सुमारे नऊ हजार ३३० क्विंटल धान्य वितरीत करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अंजली भोसले यांनी ‘लोकमत’ला दिली. तर अंत्योदय योजनेनुसार एक ्नरुपया किलो ज्वारी, दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलोने तांदूळ जिल्ह्यातील एक लाख ९३ हजार ५१२ कुटुंबांना वितरीत करण्यात येत आहे. यापैकी एक लाख ४१ हजार २९८ कुटुंबे ग्रामीण आदिवासी भागातील असून, त्यांना २५ किलो तांदूळ व १० किलो गहू आदी ३५ किलो धान्य वितरीत केले जात आहे. यासाठी त्यांना ३५ हजार ३२० क्विंटल तांदूळ व १४ हजार १३० क्विंटल गहू दरमहा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक हजार ६०० शिधावाटप दुकानांद्वारे वितरीत केले जात आहे.

Web Title: Beneficiaries of food security increased