कंट्रोलरमुळे सोसायटीही होणार स्मार्ट

By Admin | Updated: December 7, 2015 01:03 IST2015-12-07T01:03:23+5:302015-12-07T01:03:23+5:30

ठाणे शहर आता ‘स्मार्ट सिटी’ होण्याच्या दिशेने पाऊल टाकत असताना ठाण्यातील एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने ‘स्मार्ट सोसायटी’ करण्यासाठी स्मार्ट पर्याय शोधून काढला आहे.

Being a controller, the society will also be smart | कंट्रोलरमुळे सोसायटीही होणार स्मार्ट

कंट्रोलरमुळे सोसायटीही होणार स्मार्ट

ठाणे : ठाणे शहर आता ‘स्मार्ट सिटी’ होण्याच्या दिशेने पाऊल टाकत असताना ठाण्यातील एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने ‘स्मार्ट सोसायटी’ करण्यासाठी स्मार्ट पर्याय शोधून काढला आहे. सोसायटीच्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारा एक अनोखा ‘स्मार्ट कंट्रोलर’ ठाण्याच्या सोहम कुलकर्णीने तयार केला असून या कंट्रोलरमुळे मनुष्याचे काम कमी होणार आहे. ‘स्मार्ट बिल्डिंग आॅटोमेशन कंट्रोलर’ असे या प्रकल्पाचे नाव असून सोहमच्या या प्रकल्पाची ब्राझीलमध्ये वाहवा झाली आहे.
आज शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. सोसायटींचा आकार वाढत आहे. मोठमोठ्या सोसायट्या निर्माण होत असल्याने त्यातील सोयीसुविधादेखील वाढत आहेत. मोठे जिने, आजूबाजूला बगीचे तयार केले जात आहेत. या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनुष्यबळदेखील लागत आहे. वारंवार या सोयीसुविधांवर लक्ष ठेवणे आव्हान ठरते आहे. त्यामुळे सोसायटीमधील या व्यवस्थेवर नजर ठेवून त्यावर ते नियंत्रित करणारा एक स्मार्ट कंट्रोलर विद्या प्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निकमधील इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग विभागात शिकणाऱ्या सोहमने तयार केला आहे. या कंट्रोलरमुळे सोसायटी निश्चितच स्मार्ट होईल, असा त्याचा विश्वास आहे. सोसायटीच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी ओव्हरफ्लो होण्याआधीच हा कंट्रोलर आपल्या सिस्टीमने पंप बंद करेल, बगीच्यामधील माती ड्राय झाल्यावर झाडांना आपोआप पाणी घालेल, बाहेरच्या उजेडाने सोसायटीमधील दिव्यांना आपोआप कंट्रोल करेल, काही दिवे बंद तर काही दिवे डीम करेल, त्यामुळे वीजही वाचेल. शहरात होणाऱ्या वाढत्या चोऱ्या पाहता सोसायटीमध्ये चोर शिरल्यास संपूर्ण सोसायटीला सावध करेल, अशा पद्धतीचा हा कंट्रोलर आहे. सोसायटीचा सामूहिक कार्यक्रम असेल तर सर्व सोसायटीला रिमाइंडरदेखील देईल. यासाठी कंट्रोल सेन्सर्स, लाइट इंटेन्सिटीचा सेन्सर्स, मॉइश्चर लेव्हल जमिनीचा सेन्सर्स, ह्युमन सेन्सर असे वेगवेगळे सेन्सर्स या कंट्रोलरमध्ये बसविण्यात आले आहेत. हा कंट्रोलर कुठेही ठेवता येऊ शकतो. मोबाइल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून हा कंट्रोलर आॅपरेट करता येतो. या कंट्रोलरमध्ये एक मायक्रो कंट्रोलर बसविण्यात आला असून तो डेटा घेणे किंवा कंट्रोल करण्याचे काम करणार आहे. यात मोशन डिटेक्ट करून आतल्या सर्किटला सिग्नल देऊन यात बसविण्यात आलेले सेन्सर्स मुख्य कंट्रोलरला कळविणार. या कंट्रोलरमध्ये या सर्व गोष्टी रेकॉर्ड करू शकतात.

Web Title: Being a controller, the society will also be smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.