ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल काळाच्या पडद्याआड

By Admin | Updated: July 11, 2014 08:49 IST2014-07-11T01:17:44+5:302014-07-11T08:49:37+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री पद्मविभूषण जोहरा सेहगल यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीत निधन झाले.

Behind the scenes of senior actress Johora Sehgal | ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री पद्मविभूषण जोहरा सेहगल यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या १०२ वर्षाच्या होत्या. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती, असे त्यांच्या कन्या किरण यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी लोधी रोड स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
अलीकडच्या काळातील ‘चीनी कम’ या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यासोबतची त्यांची भूमिका संस्मरणीय ठरली. दिल से, वीर-झारा, हम दिल दे चुके सनम, दिल्लगी, बेन्ड इट लाईक बेकहॅम, आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रशंसनीय ठरल्या. २००७  मधील संजय लीला भन्साळी यांच्या सावरियाँ या चित्रपटातील त्यांची भूमिका अखेरची ठरली. 
२७ एप्रिल १९१२ रोजी उत्तर प्रदेशातील सहरनपूर येथे सनातन मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचा चालताबोलता इतिहास म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. फाळणीच्या जखमाही त्यांनी अनुभवल्या होत्या. 
 
- २००७ मधील ‘सावरियाँ’मधील त्यांची भूमिका अखेरची.
- अमिताभ बच्चन यांच्यासोबतची ‘चीनी कम’मधील भूमिका संस्मरणीय ठरली.
- गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत झाला बिघाड.
(वृत्तसंस्था)

 

Web Title: Behind the scenes of senior actress Johora Sehgal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.