बनावट सौंदर्य प्रसाधनांमुळे ‘सौंदर्याला’ धोका!

By Admin | Updated: April 7, 2016 01:42 IST2016-04-07T01:42:35+5:302016-04-07T01:42:35+5:30

सुंदर दिसण्याच्या नादापायी कमी पैशांत मिळत असलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा वापरही करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, रस्त्यावर विकल्या जाणारी बनावट सौंदर्य प्रसाधने त्वचेसाठी हानिकारक

'Beauty' threat due to fake beauty! | बनावट सौंदर्य प्रसाधनांमुळे ‘सौंदर्याला’ धोका!

बनावट सौंदर्य प्रसाधनांमुळे ‘सौंदर्याला’ धोका!

मुंबई : सुंदर दिसण्याच्या नादापायी कमी पैशांत मिळत असलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा वापरही करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, रस्त्यावर विकल्या जाणारी बनावट सौंदर्य प्रसाधने त्वचेसाठी हानिकारक असल्याचे मत त्वचारोगतज्ज्ञ डॉ. योगेश कल्याणपाड यांनी मांडले आहे.
नामांकित सौंदर्य प्रसाधन कंपन्या महिला, तरुणींचे सौंदर्य खुलवण्यासाठी चांगल्या प्रतीचा कच्चा माल वापरतात, त्यावर योग्य ती प्रक्रिया केली जाते. त्यानंतर या उत्पादनांची तपासणी केली जाते. त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे नामांकित उत्पादने वापरल्याने त्रास होण्याची शक्यता कमी असते. पण अनेकदा महिला, तरुणींना इतकी महागडी उत्पादने खरेदी करणे शक्य नसते आणि सहजरीत्या कमी दरात मिळणारी ही बनावट उत्पादने खरेदी करण्याचा मोह त्यांना आवरत नाही. त्यामुळे त्या स्वत:ची फसवणूक करतात आणि सौंदर्याशी खेळही करतात, असे मत त्वचारोगतज्ज्ञ डॉ. योगेश कल्याणपाड यांनी मांडले.
डॉ. योगेश यांनी पुढे सांगितले, रस्त्यावर कमी दरात विकल्या जाणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये भेसळ केलेली असते. यामध्ये त्वचेला हानिकारक असणाऱ्या द्रव्यांचा वापर प्रमाणाबाहेर केला जातो. त्यामुळे त्वचेवर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. या प्रसाधनांमध्ये त्वचेला अपायकारक विविध पदार्थ जसे की स्टेरॉइड, लेड, सिल्व्हर इत्यादी हानिकारक पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ त्वचेच्या संपर्कात आल्यावर त्वचेला विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात. जसे की, अ‍ॅलर्जी होणे, त्वचा काळी पडणे, लाल होणे, पुटकुळ्या उठणे, त्वचा शुष्क पडणे असा त्रास होतो. अपायकारक पदार्थांचे प्रमाण जास्त असलेली सौंदर्य प्रसाधने जास्त काळ वापरल्यास वारंवार अ‍ॅलर्जी होणे. त्वचेला आणि काही वेळा शरीराला सूज येते, त्वचेवर सफेद डाग पडणे (ल्यूकोडर्मा), त्वचा नीळसर काळी होणे (लायकिनॉइड रिअ‍ॅक्शन), त्वचा काळी पडणे असे त्रास जाणवतात. काजळामुळे डोळ्यांना त्रास होतो, असेही त्यांनी सांगितले.
> असा होतो
सौंदर्याचा
बाजार

रेट कार्ड
काजळ
मॅबलिन - १९० रु. किंवा १९९ रु.
मार्केट किंमत - १२० ते १५० रु.
५० काजळ घेतल्यास - ६० रु.
लॅक्मे आयकॉनिक - २१० रु.
मार्केटमध्ये किंमत - २०० ते १२० रु.
५० काजळ घेतल्यास - ८० रु.
मॅक काजळ - छापील किंमत नाही
मार्केट किंमत - १५० रु.
५० काजळ घेतल्यास - ६० रु.
लायनर
कोनिका - ६५
लॅक्मे - ६५
एडीएस - ११०
मार्केट किंमत - ५० रु.
बेबी लिप्स - १४० ते १६५ रु.
मार्केट किंमत - ५० रु.
जास्त घेतल्यास - ४० रु.
लिपस्टिक
मॅक - १२०० रु. (१८ शेड्स)
मार्केट किंमत - ५०० रु.
पूर्ण बॉक्स घेतल्यास - २००
७ हेवन - २०० रु.
मार्केट किंमत - १०० रु.
कॉम्पॅक्ट
लॅक्मे ९ टू ५ - ४५० ते ३९९ रु.
मार्केट किंमत - २५० रु.
५० पीस घेतल्यास - १५० रु.
एम एन मेनॉव - एमआरपी नाही
मार्केट किंमत - १८०
५० क्रीम घेतल्यास - १२०
लॉरिएल - ७५० रु. किंवा काही ठिकाणी छापील किंमत नाही
मार्केट किंमत - २५० रु.
५० पीस घेतल्यास - २०० रु.
मॅक - छापील किंमत नाही
मार्केट किंमत - २९९ रु.
५० पीस घेतल्यास - १०० रु.
बीबी क्रीम
लॅक्मे - ४५० रु.
मार्केट किंमत ३०० रु.
२० क्रीम घेतल्यास - २०० रु.
एडीएस - १५०
मार्केट किंमत - १५०
५० क्रीम घेतल्यास - १३०
न्यूट्रोजीना - ६५० रु.
मार्केट किंमत - ५०० ते ४०० रु.
२० क्रीम घेतल्यास - ३०० ते २०० रु.
> प्रसाधनांचा ‘कस्टम’खेळ
मनीषा म्हात्रे, पूजा दामले ल्ल मुंबई
रस्त्यावर सर्रासपणे उपलब्ध असलेली
‘बॅ्रण्डेड’ सौंदर्यप्रसाधणे खरोखरंच ब्रॅण्डेड असतात का? कस्टमचा माल म्हणून विकला जाणारा ही सौदर्य प्रसाधणे नेमके येतात कोठून, ते विश्वासार्ह असतात का? अब्जावधी रुपयांचा हा बाजार एक प्रकारे काळाबाजारच. त्याच्या काळ्या सौंदर्यबाजाराचे ‘लोकमत’ने केले हे स्टिंग आॅपरेशन...प्रतिनिधी : हमे बल्क में माल खरीदना है, कैसे दोगे?
विक्रेता : देखो, आप पच्चीस या पचास पीस लोगे तो भी ज्यादा कम नहीं होगा. मार्जिन है, उतना ही कम कर सकता हूँ. उससे ज्यादा नहीं. कहाँ पर बेच रहे हो?
प्रतिनिधी : विरार में...
विक्रेता : विरार में... पर कहाँ, याने दुकान में बेचोगे या घर से बेचना है.
प्रतिनिधी : दुकान में नहीं. एक ब्युटी पार्लर है. तो वहीं पे सप्लाय करना है.
विक्रेता : हाँ, तो फिर ठीक है. मैं इसलिए पुछ रहा हूँ, क्यूंकी ये दुकान में नहीं बेच सकते. रेड गिर जाएगी. कहाँ से लाया है पुछताछ हो सकती है.
प्रतिनिधी : हम दुकान नही लेके जाएंगे.
विक्रेता : वैसा नहीं. ये कस्टम का माल है ना.. आपको जैसा चाहिए, वहाँ सब नही मिलेगा. जो मिलता है, वही लेना पडेगा. कस्टम का होने सें जो मिला है, वहीं लाता हूँ.
प्रतिनिधी : ये ओरिजनल होगा ना?
विक्रेता : क्या मॅडम, ये देखो ना (बारकोड दाखवत). सीधा बोलने का नेटपर चेक करो. ये जो प्रोडक्ट है, इसपर प्राइज नहीं लिखी होती है.
प्रतिनिधी : ये ऐसा कैसा, प्राइज नहीं है?
विक्रेता : अरे ये ड्युटी फ्री है. इसपर प्राइज नहीं होती.
प्रतिनिधी : काही लोक हातात घेऊन फिरतात. ते कसे असतात प्रोडक्ट? त्यांचे काय?
विक्रेता : अब देखो.. बडी दुकान में रखेंगे तो उनका खर्चा ज्यादा होगा. हात में लेके घुमेंगे तो उनका खर्चा कम. दुकान में ब्रॅण्डेड कॉस्मेटिक प्रोडक्ट की प्राइज हजार, सोला सो रुपया होती है. मैं यही ५५० बोलता हूँ. पर, ३०० भी लेता हू. आपको २५० तक दुंगा. ज्यादा माल चाहिए इसलिए.
प्रतिनिधी : कसय ना, पार्लरला माल द्यायचा आहे. म्हणून विचारतोय, तिथून काही तक्रार यायला नको. म्हणून ब्रॅण्डेड आहे की नाही, हे पाहतोय.
विक्रेता : देखो, ये बोलते है अमरिका से लाया, लंडन से लाया, हमने कहाँ देखा है ये काला है या गोरा है. जो ड्युटी फ्री मिलता है, वहीं से उठाके लाते है.
प्रतिनिधी : तो ये माल कहाँसे आता है?
विक्रेता : अरे, ये ड्युटी फ्री होता है. कस्टम से जब्त करते हैं ना. वहीं से लाते है. पर एक है, अंदर का माल तुटा-फुटा रहेगा तो वो आपकी जिम्मेदारी, यहाँ गॅरेंटी नही. वहाँ फेक देने से बॉक्स खराब हो जाता है. माल अंदर अच्छा रहता है.
प्रतिनिधी : पर ये माल मिलता कहाँ पर है?
विक्रेता : ये सिधा नहीं आता. व्हाया व्हाया लाया जाता है. ये तो करोडों की बात है. अपनी उतनी हैसिअत नही. सिधा कोई नहीं बेचता है. एक सिंधी बंदा है. वो पैसा लगाता है. उससे हम खरीदते है. आपको माल मिल जाएगा वो टेन्शन नहीं है. पर अ‍ॅडव्हान्स देना पडेगा.
प्रतिनिधी : हाँ, वो तो देंगे. पर कौनसे प्रोडक्ट मे ज्यादा फायदा है?
विक्रेता : मॅडम अब इतना डिटेल नहीं बोल सकते. हमें तो मिलता है. कभी दिन में ५-१० हजार मिलते है. पर, बारीश में पानी भर गया तो, कुछ धंदा नहीं होता. हम तो कमा लेते है. यहाँ ‘देना भी’ पडता है. महिने का १५ हजार देने में ही जाता है. यहाँ खडे रहने का पैसा देना पडता है. ये माल तो कस्टम से ड्युटी फ्री का आता है. कंटेनर खाली करने के लिए पुलिस एक रात का २५-३० हजार रुपया लेती है. पुरा कंटेनर भर के कॉस्मेटिक आता है. वहाँ से लेते है.
> मालाड मार्केट (पश्चिम)

प्रतिनिधी : ये नया ब्रॅण्ड लगता है. कैसे दिया?
विक्रेता : हां मॅडम, नया है ये. गुजरात से लाते है. बॅ्रण्डेड कंपनी से हटके है. आपको क्या चाहिए?
प्रतिनिधी : बॅ्रण्डेड में नहीं है क्या? उसका प्राइज कम होना चाहिये.
विक्रेता : हाँ, मॅडम हमारे पास माल है. ये देखो ना. ये माल भी है. और दुसरी कंपनी का भी है. आपको कौनसा चाहिए ये बताओ.
(विक्रेत्याचा दुसरा सहकारी मध्येच आला.)
सहकारी : ये माल मत खरिदना. दुसरा दिखाता हूँ.
प्रतिनिधी : क्यूँ? अभी तो आपने दिखाया. आप बेचते हो ना ये माल?
विक्रेता : नहीं मॅडम, हम नहीं बेचते है. सिर्फ दिखाने के लिये रखा हे. ये जो सॅम्पल का आता है ना, वो दिखाया था. पर, बॅ्रण्डेड और कम किंमत में माल चाहिए, तो कांदिवली के मार्केट में जाना. वहाँ से आपको मिल सकता है. यहाँ पे कम नहीं होगी किंमत. आपको गुजरात का माल चाहिये तो बोलो उसमें हर प्रकार के प्रोडक्ट है और वो हम आपको बिल के साथ देंगे.
(दुसऱ्या विक्रेत्याला संशय आल्याने प्रतिनिधींना दुसऱ्या दुकानात जाण्याचा सल्ला देण्यात आला. पूर्ण माहिती दिली नाही.)

Web Title: 'Beauty' threat due to fake beauty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.