सुंदर ते ध्यान, उभे वीटेवरी...!

By Admin | Updated: July 27, 2015 23:15 IST2015-07-27T23:15:13+5:302015-07-27T23:15:13+5:30

वारकरी पेहराव, कपाळी गंध, हातात टाळ-मृदुंग आणि ओठांवर विठूनामाचा गजर अशा भक्तीमय वातावरणाने येथे अवघी पंढरी अवतरली असल्याचे चित्र आषाढी एकादशीनिमित्त दिसून आले.

Beautiful to meditate, standing Vitavari ...! | सुंदर ते ध्यान, उभे वीटेवरी...!

सुंदर ते ध्यान, उभे वीटेवरी...!

ठाणे : वारकरी पेहराव, कपाळी गंध, हातात टाळ-मृदुंग आणि ओठांवर विठूनामाचा गजर अशा भक्तीमय वातावरणाने येथे अवघी पंढरी अवतरली असल्याचे चित्र आषाढी एकादशीनिमित्त दिसून आले. ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सातशे वर्षाहून अधिक काळाची परंपरा वारीला लाभली आहे. हा वैभवशाली वारसा जपण्यासाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली, मु्रंबा, टिटवाळा, भाईंदर येथील शाळांमधून दिंडी काढण्यात आली होती.
ठाणे पूर्व येथील आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढून पर्यावरणाचा संदेश दिला. या दिंडीत पहिली ते १० वी इयत्तेतील ३००-३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही या दिंडीमध्ये सहभाग दर्शवला. तसेच विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेषभूषा परिधान करून आपल्या परंपरेचा मान राखला. त्याचबरोबर नाखवा हायस्कूल येथे वृक्षारोपणाचाही कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी नाखवा शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेश्मा देशपांडे तर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला सूर्यवंशी उपस्थित होत्या. तर ठाणे पश्चिम येथील सरस्वती सेकंडरी हायस्कूल नौपाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील पारंपारिक वेषभूषा परिधान करून दिंडी काढली होती.
तसेच, शिवाई महाविद्यालय व शिवाई विद्यालयाच्या प्रांगणात एकादशी अतिशय जल्लोषात उत्साहमय वातावरणात साजरी करण्यात आली.
आपल्या भारतीय संस्कृतीच्या थोरवीचे जतन करण्यासाठी प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीचा अनुभव घेता यावा यासाठी विद्यालयात दरवर्षी आषाढी एकादशी साजरी केली जाते. साक्षात वारकऱ्यांची शाळा भरली होती. दिंडीत सर्व विद्यार्थी वारकरऱ्यांच्या वेशभूषेत विठूनामांचा गजर करीत होते. विठ्ठल आणि रु क्मिणीच्या वेशभूषेत असलेले विद्यार्थी दिंडीची शोभा वाढवत होते. संपूर्ण शिवाईनगर परिसर या दिंडीमुळे भक्तीमय झाला होता. काही शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रमही करण्यात आला.
ठाणे येथील ४०० वर्षांचा इतिहास असणाऱ्या कौपीनेश्वरच्या मंदिरात पंचामृतांचा अभिषेक करून भक्तीमय वातावरणात पहाटे महापूजा विनायक गाडे यांच्या हस्ते पार पडली. तर सायंकाळी ८.३० वाजता महाआरती करण्यात आली तर ठाणे येथील सिध्देश्वर राम मंदिर संस्थानात विठोबाच्या साग्रसंगीत पूजा झाल्यानंतर सत्यानारायणचीही पूजा झाली.

Web Title: Beautiful to meditate, standing Vitavari ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.