पेट्रोल पंपावर मारहाण; व्हायरल व्हिडिओनंतर पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:06 IST2021-01-15T04:06:56+5:302021-01-15T04:06:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरीवलीत मोटारसायकलस्वाराला मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. रविवारी हा प्रकार घडल्यानंतर त्याचा ...

पेट्रोल पंपावर मारहाण; व्हायरल व्हिडिओनंतर पाच जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवलीत मोटारसायकलस्वाराला मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. रविवारी हा प्रकार घडल्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर कस्तुरबा पाेलिसांनी तपासाअंती ही कारवाई केली.
बोरीवली पूर्वच्या मागाठाणे येथील एचपी पेट्रोल पंपावर रविवारी रात्री हा प्रकार घडला हाेता. पेरियास्वामी हरिजन नावाचा इसम याठिकाणी पेट्रोल भरायला आला होता. पेट्राेल भरुन झाल्यानंतर दिलेल्या रकमेतील बाकी रक्कम देण्यास पंप कर्मचाऱ्यांना उशीर झाल्याने हरिजनने जोरजोरात हॉर्न वाजविण्यास सुरुवात केली. त्यामुळे पंप कर्मचारी आणि हरिजन यांच्यात बाचाबाची सुरू झाली. जी नंतर हाणामारीवर गेली.
हरिजन याला ५ कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ कस्तुरबा पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी तपासाअंती पाच जणांना अटक केली. तर, हरिजनवरही गैरव्यवहाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...............................