कच्ची सुपारी चघळणाऱ्यांनो सावधान!

By Admin | Updated: August 30, 2015 23:55 IST2015-08-30T23:55:38+5:302015-08-30T23:55:38+5:30

‘कोणतेही व्यसन नाही, फक्त सुपारी खातो,’ असे म्हणणाऱ्यांना सुपारीमुळे कोणताही आजार होत नाही, असेच वाटते. मात्र हा मोठा गैरसमज आहे. कच्ची सुपारी खाणाऱ्यांना

Beat the raw betel cheers! | कच्ची सुपारी चघळणाऱ्यांनो सावधान!

कच्ची सुपारी चघळणाऱ्यांनो सावधान!

मुंबई : ‘कोणतेही व्यसन नाही, फक्त सुपारी खातो,’ असे म्हणणाऱ्यांना सुपारीमुळे कोणताही आजार होत नाही, असेच वाटते. मात्र हा मोठा गैरसमज आहे. कच्ची सुपारी खाणाऱ्यांना सबम्युकस फायब्रोसिस (तोंड उघडता न येणे) हा आजार जडण्याचा धोका आहे. अशा लोकांना हा आजार ५ ते १० वर्षांत जडतो. महिलांना आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे, असे कन्सल्टंट सर्जिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ. धैर्यशील सावंत यांनी सांगितले.
तंबाखू, गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना मुखाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. सबम्युकस फायब्रोसिस (एसएमएफ) आजारग्रस्त महिलांचे प्रमाण ६० टक्के तर पुरुषांचे प्रमाण ४० टक्के इतके आहे. ग्रामीण परिसरात महिला जास्त सुपारीचे सेवन करतात. कच्ची सुपारी कमी प्रमाणात खाल्ल्यानंतरही तोंड कोरडे पडते. अनेक वर्षे ती खाल्ल्याने तोंडाच्या संवेदनाही कमी होतात. यामुळे तोंडात होणारे बदल त्यांना जाणवत नाहीत. यामुळेच सबम्युकस फायब्रोसिस हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.
एकदा एसएमएफ आजार झाल्यावर तो पूर्णत: बरा होऊ शकत नाही. वेळीच उपचार केल्यास आजार वाढण्यापासून थांबवता येऊ शकतो, असे डॉ.सावंत यांनी सांगितले.

Web Title: Beat the raw betel cheers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.