Join us

लोकल प्रवासकोंडीसाठी राहा सज्ज; रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 06:30 IST

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवार, ३० एप्रिल रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

पश्चिम रेल्वे

कुठे ? सांताक्रुझ ते जोगेश्वरी पाचव्या मार्गिकेवरकधी ? सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत परिणाम : या ब्लॉकदरम्यान काही लोकल सेवा रद्द असणार आहे. तसेच पाचव्या मार्गिकेवर सांताक्रुझ ते जोगेश्वरीदरम्यान ब्लॉकमुळे मेल - एक्स्प्रेस आणि लोकल सेवांचा वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वे कुठे ? माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर कधी ? सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ पर्यंत परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. 

हार्बर रेल्वे कुठे ? सीएसएमटी - चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाउन मार्गावर कधी? ११:१० ते ४:४० वाजेपर्यंतपरिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी / वडाळा येथून वाशी / बेलापूर / पनवेलकरिता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे / गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल / बेलापूर / वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव / वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील. 

टॅग्स :मुंबईलोकल