सावधान, आता आलाय ‘क्रिप्टोजॅकिंग’ व्हायरस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:21 AM2018-07-03T00:21:46+5:302018-07-03T00:22:30+5:30

सीस्टिम हॅक करून ‘खंडणी’ उकळणाऱ्या ‘रॅन्सम’ व्हायरसने दोन वर्षांपूर्वी धुमाकूळ घातला होता, पण आता या ‘रॅन्सम’पेक्षाही भीषण ‘क्रिप्टोजॅकिंग’ व्हायरस तुमचे ‘क्रिप्टोकरन्सी’ खाते हॅक करण्यासाठी आला आहे.

 Be careful, now 'cryptojaking' virus! | सावधान, आता आलाय ‘क्रिप्टोजॅकिंग’ व्हायरस!

सावधान, आता आलाय ‘क्रिप्टोजॅकिंग’ व्हायरस!

googlenewsNext

मुंबई : सिस्टिम हॅक करून ‘खंडणी’ उकळणाऱ्या ‘रॅन्सम’ व्हायरसने दोन वर्षांपूर्वी धुमाकूळ घातला होता, पण आता या ‘रॅन्सम’पेक्षाही भीषण ‘क्रिप्टोजॅकिंग’ व्हायरस तुमचे ‘क्रिप्टोकरन्सी’ खाते हॅक करण्यासाठी आला आहे. पाच महिन्यांत अशा ३० लाख घटना समोर आल्या आहेत.
केंद्र सरकारची अधिकृत मान्यता नसली, तरी बिटकॉइनसारख्या ‘क्रिप्टोकरन्सी’चा विस्तार झपाट्याने होत आहे. भारतात जवळपास सहा ते आठ अशा ‘क्रिप्टोकरन्सी’ बाजारात आहेत. या क्रिप्टोकरन्सीतील खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे आॅनलाइन व अ‍ॅपवर आधारित असतात. त्यासाठी प्रत्येकाचे खाते त्या संबंधित क्रिप्टोकरन्सीमध्ये उघडले जाते. ‘क्रिप्टोजॅकिंग’ हा हे खातेच हॅक करणारा व्हायरस आहे.
याबाबत क्विकहील अ‍ॅन्टी व्हायरस सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर म्हणाले की, रॅन्सम व्हायरसच्या हल्ल्यात हॅकरला पैसे न देताही त्यातून बाहेर पडता येत होते, पण ‘क्रिप्टोजॅकिंग’मध्ये ही सोय नाही. यात हॅकर थेट तुमच्या सीस्टिम प्रोसेसिंग पॉवरला हॅक करून तुमची क्रिप्टोकरन्सी स्वत:च्या ताब्यात घेतो. त्यामुळे हॅकरला पैसे दिल्याखेरीज बाहेर पडणे अशक्य असते. जानेवारी २०१८ मध्ये हा व्हायरस समोर आला. त्या वेळी त्याचे फक्त ८ प्रकार होते. आता हे प्रकार २५ झाले आहेत. या व्हायरसचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी धारकांनी सावधान राहण्याची गरज आहे.

हल्ला कसा ओळखाल?
रॅन्सम व्हायरसनुसार ‘क्रिप्टोजॅकिंग’चा हल्ला चटकन ओळखता येत नाही, पण याचे मुख्य लक्षण म्हणजे, तुमच्या सीस्टिमचा वेग खूप मंदावतो. बॅटरी खूप झपाट्याने खर्च होऊ लागते. सीस्टिम क्रॅश होऊ लागते. लॅपटॉप किंवा कम्प्युटर वापरत असल्यास त्याचा पंखा जलद फिरू लागतो. मोबाइल फोन असल्यास बॅटरी खूप गरम होते. ‘क्रिप्टोकरन्सी’ वापरणाºयांना ही लक्षणे दिसताच, व्हायरसचा हल्ला झाल्याचे ओळखून घ्यावे.

Web Title:  Be careful, now 'cryptojaking' virus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई