सावधान! मोबाइलवरून आर्थिक गंडा
By Admin | Updated: March 15, 2015 22:53 IST2015-03-15T22:53:25+5:302015-03-15T22:53:25+5:30
मोबाईलवरून आर्थिक गंडा लावण्याचे प्रमाण वाढत असून तिल्हेर येथील तरूण संतोष वारघडे या तरूणाला १५ हजाराचा त्याच्या मोबाईलवरून त्याला गंडा लावला

सावधान! मोबाइलवरून आर्थिक गंडा
पारोळ : मोबाईलवरून आर्थिक गंडा लावण्याचे प्रमाण वाढत असून तिल्हेर येथील तरूण संतोष वारघडे या तरूणाला १५ हजाराचा त्याच्या मोबाईलवरून त्याला गंडा लावला. त्यामुळे आता ग्रामीण परिसरात सुद्धा सायबर क्राईममध्ये वाढ होत असून याला नाहक निर्दोष तरूण बळी पडत आहे.
संतोष घरी असताना अज्ञात इसमाने फोन करून तु जर १५ हजाराचे दिलेल्या मोबाईलवर रिचार्ज केले तर तुला लाखो रू. मिळतील असा कॉल आल्यानंतर आपण जर रिजार्च केले तर आपल्याला लाखो रू. मिळतील या भोळ्या आशेने स्वत:जवळ एवढी रक्कम नसतानाही पारोळ फाट्यावरील गणेश मोबाईल सेंटरवर जाऊन अज्ञात व्यक्तीने दिलेल्या १० नंबरवर विविध रिचार्ज कंपन्यांच्या मोबाईल नंबरवर १५ हजाराचे रिचार्ज केले. पण त्याला कोणतेही स्वरूपाचे बक्षिस न मिळाल्याचे लक्षात आल्याने आपल्याला मोबाईल वरून १५ हजाराचा गंडा लागल्याचे लक्षात आहे. तसेच त्या नंबरची तपासणी केली असता ते नंबर महाराष्ट्राबाहेरचे असल्याचे निष्पन्न झाले. हा १५ हजाराची रिचार्ज उधार केल्यामुळे मोबाईलदुकानदारही अडचणीत आला. शेवटी त्या मुलाची परिस्थिती गरीब असतानाही त्यांच्या घरच्यानी हा भुर्दंड सहन केला. (वार्ताहर)