इंग्रजी माध्यम शाळा दत्तक देणार
By Admin | Updated: May 31, 2015 01:49 IST2015-05-31T01:49:01+5:302015-05-31T01:49:01+5:30
महापालिकेच्या शाळांचा दर्जा खालवल्याने त्यांची पटसंख्या वाढविण्याबरोबरच या शाळांचा दर्जा उचावण्यासाठी दत्तक शाळांची संकल्पना ठाणे महापालिकेने पुढे आणली आहे.
इंग्रजी माध्यम शाळा दत्तक देणार
अजित मांडके ल्ल ठाणे
महापालिकेच्या शाळांचा दर्जा खालवल्याने त्यांची पटसंख्या वाढविण्याबरोबरच या शाळांचा दर्जा उचावण्यासाठी दत्तक शाळांची संकल्पना ठाणे महापालिकेने पुढे आणली आहे. त्यानुसार पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा या दत्तक स्वरुपात सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामध्ये सामाजिक संस्था, कार्पोरेट कंपन्या आदींची मदत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे पालिकेने उचललेल्या या योजनेला ५ सामाजिक संस्थांसह कार्पोरेट कंपनीने स्वारस्य दाखविले आहे.
सध्या ठाणे महापालिकेच्या माध्यमातून महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा दर्जा उचावण्यासाठी पटसंख्या वाढविण्यासाठी विविध स्वरुपाच्या योजना आखल्या जात आहेत. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे करण्यात येणार आहे. तसेच पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास हायटेक करण्यात येणार असून त्यांच्या हाती टॅब पडणार आहेत.
पालिकेच्या या शाळा दत्तक घेण्यासाठी पाच सामाजिक संस्था आणि कार्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेतल्याची माहिती पालिकेने दिली. विशेष म्हणजे या शाळांवर तज्ज्ञ शिक्षकांची निवड करणे, विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करणे आदी कामेही त्याच संस्थांना करावी लागणार आहेत. पालिका केवळ जागा उपलब्ध करुन देणार असून शिक्षणापोटी कोणत्याही स्वरुपाची फी मात्र आकारली जाणार नाही.
शाळांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवृत्त शिक्षक, तज्ज्ञ शिक्षक, कार्पोेरट कंपनी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींची एक समिती स्थापन करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून, शाळांवर लक्ष ठेवले जाणार आहे. याशिवाय पुढे जाऊन पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंगची संकल्पनादेखील पुढे आणली असून या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे.
च्महापालिकेने पाच वर्षापूर्वी सुरु केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचाही दर्जा फारसा सुधारलेला नाही. इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा असून मनोरमा नगर, टेंभीनाका, उथळसर, मुंब्रा, किसनगर आणि मानपाडा येथे या शाळा सुरु आहेत. येथे १४०० विद्यार्थी शिकत असून ३६ शिक्षक शिकविण्याचे काम करीत आहेत.
च्एकाही शाळेला मुख्याध्यापक नसून शिक्षकांचीही कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी शिक्षण विभागावर धडक दिली होती. परंतु अद्याप शिक्षक मिळालेले नसल्यामुळेच आता इंग्रजी माध्यमांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे