शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई
By Admin | Updated: November 7, 2016 03:15 IST2016-11-07T03:15:13+5:302016-11-07T03:15:13+5:30
महापालिकेच्या निवडणुकीची रणधूमाळी सुरू झाली असून, प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे

शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई
शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई
मनोहर कुंभेजकर ल्ल मुंबई
महापालिकेच्या निवडणुकीची रणधूमाळी सुरू झाली असून, प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: शिवसेना-भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीबाबत अद्यापही संभ्रम कायम असल्याने, निवडणुकीच्या तिकिटांसाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. शहरासह उपनगरात हेच चित्र कायम असून, पश्चिम उपनगरातील पी-दक्षिण वॉर्डमध्ये तर रस्सीखेच सुरू असून, येथे शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे मत राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले आहे.
पी-दक्षिणमध्ये ५०, ५१, ५४, ५५, ५६, ५७ आणि ५८ असे एकूण ७ प्रभाग आहेत. २०१२च्या पालिका निवडणुकीत एकूण ७ प्रभागांपैकी शिवसेनेचे ५ आणि काँग्रेसचे २ असे एकूण ७ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी पूर्वीच्या प्रभाग क्रमांक ४५ मधून काँग्रेसच्या स्नेहा झगडे, ४६ मधून वर्षा टेंबवलकर, ४८ मधून शिवसेनेचे सुनील प्रभू, ४९ मधून शिवसेनेच्या लोचना चव्हाण, ५० मधून शिवसेनेचे राजू पाध्ये, ५१ मधून शिवसेनेच्या प्रमिला शिंदे आणि ५२ मधून काँग्रेसच्या किरण पटेल हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
भाजपाचा या विभागात एकही नगरसेवक नसल्यामुळे, या विभागात आपले नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी राज्यमंत्री विद्या ठाकूर आणि मुंबई अध्यक्षांसह आमदार अमित साटम यांच्यावर आहे.
दिग्गज आणि नवे चेहरेही
(दक्षिण)विभागात प्रभाग क्रमांक ५० हा खुला असून, या विभागात शिवसेनेतर्फे विद्यमान नगरसेवक राजू पाध्ये आणि माजी शाखाप्रमुख दिनेश राव, तर भाजपातर्फे राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक ठाकूर याचे नाव चर्चेत आहे.
च्प्रभाग क्रमांक ५१ हा खुला असून, यामध्ये शिवसेनेचे उपविभागप्रमुख शशांक कामत, शाखाप्रमुख स्वप्निल टेंबवलकर आणि हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संदीप जाधव यांची नावे चर्चेत आहेत. स्वप्निल टेंबवलकर याची आई १० वर्षे येथे नगरसेवक होती, तर पाच वर्षे त्यांची पत्नी वर्षा यांच्याकडे येथील नगरसेवकपद आहे. परिणामी, येथे नवा चेहरा गरजेचा असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. काँग्रेसतर्फे विद्यमान नगरसेविका स्नेहा झगडे किंवा त्यांचे वडील विनायक झगडे, रेखा सिंग आणि त्यांचे पती दिलीप सिंग यांची नावे चर्चेत आहेत.
च्प्रभाग क्रमांक ५४ हा महिलांसाठी खुला असून, येथून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका वर्षा टेंबवलकर, शीतल देवरुखकर आणि सुमंगल कोलथलकर यांची नावे चर्चेत आहेत, तर भाजपातर्फे महिला मोर्चाच्या अध्यक्षा जैनम उपाध्याय आणि डॉ. अमर यादव हे पत्नीच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत.
च्प्रभाग क्रमांक ५५ हा पुरुषांच्या इतर मागासवर्गीय गटासाठी राखीव असून, येथून शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक दिलीप शिंदे, उपविभागप्रमुख दीपक सुर्वे व शाखाप्रमुख राजेश जयस्वाल, वीरेन लिंबाचीया यांची नावे चर्चेत आहेत. येथून भाजपाचे माजी उपमहापौर आणि के(पश्चिम)च्या जुहू येथील प्रभाग क्रमांक ६३ मध्ये असलेले भाजपाचे विद्यमान नगरसेवक दिलीप पटेल यांचे नाव चर्चेत आहे. ते जरी जुहू येथील नगरसेवक असले, तरी त्यांचे या विभागावर लक्ष आहे. काँग्रेस विद्यमान नगरसेविका किरण पटेल यांचे नाव येथून चर्चेत आहे.
च्प्रभाग क्रमांक ५६ हा महिलांसाठी खुला असून, येथून शिवसेनेतर्फे पी(दक्षिण) विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा लोचना चव्हाण, तर भाजपातर्फे माजी नगरसेवक समीर देसाई हे पत्नीच्या तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत.
च्प्रभाग क्रमांक ५७ हा महिलांसाठी खुला असून, येथून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका प्रमिला शिंदे तर भाजपातर्फे श्रीकला पिल्ले यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसच्या माधवी राणे यांची नावे चर्चेत आहेत, तर राष्ट्रवादीकडून तालुका अध्यक्ष सुखदेव कारंडे यांच्या पत्नी सुनिता कारंडे यांची नावे चर्चेत आहेत.
च्प्रभाग क्रमांक ५८ हा खुला असून, येथून शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी येथून निवडणूक लढवावी, असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले. भाजपातर्फे माजी नगरसेवक समीर देसाई आणि विद्यमान नगरसेवक दिलीप पटेल, काँग्रेसतर्फे माधवी राणे तर मनसेचे वीरेंद्र जाधव तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुका अध्यक्ष सुखदेव कारंडे यांची नावे चर्चेत आहेत.
नवी प्रभाग रचना
च्प्रभाग क्रमांक ५०(खुला) : चिंचोली बंदर रोड खाडी कडून रेल्वे लाइनपर्यंत, पिरामल रस्ता विभाजन डावी बाजू, बांगूर नगर
च्प्रभाग क्रमांक ५१(खुला) : गोरेगांव-मुलुंड लिंक रोड पुलाकडून डावी बाजू, प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेट उजवी बाजू, उडिपी हॉटेल, पेरूबाग डावी बाजू, नंदादीप शाळेची गल्ली उजवी बाजू, बावटेकडी डावी बाजू हायवेपर्यंत, मोहन गोखले मार्ग ओबेरॉय टॉवरकडून अभिषेक इमारत, यशोधाम डावीकडून जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग
च्प्रभाग क्रमांक ५४(महिला) : पांडुरंग वाडी उड्डाण पुलापासून जयप्रकाशनगर, सोनावाला रोड, कामा वसाहत, शर्मा इस्टेट, बामणवाडी, जयकोच-रामनगरपर्यंत
च्प्रभाग क्रमांक ५५ (इतर मागास वर्गीय) : शास्त्रीनगर, मनपा वसाहत, गावदेवी, लोकमान्य टिळक रोड क्रमांक १ ते ६, मिठानगर, आंबेडकर नगर, नवीन शास्त्रीनगर, सिद्धार्थनगर(नवीन)इंडस्ट्रियल कॉलनी, सिद्धार्थनगर क्रमांक ४, सानेगुरुजी नगर, बेवलकर वाडी, वाधवा इमारत, उन्नत नगर, पिरामल नगर, देवछाया, त्रिपाठी भवन, जयकर स्मृती, आरे रोड परिसर, जवाहरनगर क्रमांक १ ते १२, गजानन कॉलनी
च्प्रभाग क्रमांक ५६ (महिला) : बांगूरनगर सिग्नलपासून एमजी रोड-दीपक ज्यूसकडून आतील रस्ता पोलीस वसाहतपर्यंत
च्प्रभाग क्रमांक ५७ (महिला) : लक्ष्मीनगर, भगतसिंग नगर, वसंत गॅलेक्सी ते मेघा मॉल
च्प्रभाग क्रमांक ५८ (खुला) : मोतीलाल नगर क्रमांक १, वल्लभ, सेजल पार्क, सिद्धिविनायक, बेस्टनगर, जुने सिद्धार्थ नगर, जवाहर नगर झोपडपट्टी ते राम मंदिर रोड, पत्रावाला चाळ