Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पुस्तकांचे गठ्ठे गायब! विरोधी पक्षनेत्यांचा आरोप, तावडेंचा खुलासा असमाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:49 IST

अवांतर वाचन उपक्रमांतर्गत खरेदी केलेल्या पुस्तकांत आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने त्या पुस्तकांचे गठ्ठे गायब करण्यात आले असून नवीन पुस्तके ५ ते ६ दिवसांत आणून देण्याची तंबी प्रकाशकांना देण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

मुंबई : अवांतर वाचन उपक्रमांतर्गत खरेदी केलेल्या पुस्तकांत आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने त्या पुस्तकांचे गठ्ठे गायब करण्यात आले असून नवीन पुस्तके ५ ते ६ दिवसांत आणून देण्याची तंबी प्रकाशकांना देण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.शालेय शिक्षण विभागामार्फत राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय विचार साधना या प्रकाशनाकडून चढ्या दराने खरेदी करण्यात आलेल्या पुस्तकांमधील ‘बाळ नचिकेत’ या पुस्तकात कोणताही आक्षेपार्हमजकूर नाही, असा खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. मग ही पुस्तके का गायब करण्यात आली, असा सवाल विखे यांनी उपस्थित केला.‘बाळ नचिकेत’ या पुस्तकाबाबत खुलासा करताना तावडेयांनी ‘ऋषी अत्री’ ‘श्री सारदामाता’ या पुस्तकांचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळला. शिवाय,या पुस्तकांच्या खरेदीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाशी निगडित ‘भारतीयविचार साधना’ या प्रकाशनसंस्थेचे जे पुस्तक २० रुपयांना उपलब्ध आहे, तेच पुस्तकसरकारने ५० रुपयांत खरेदीकेले असून, या प्रकाशनाकडूनतब्बल ८ कोटी १७ लाख रुपयांची खरेदी झाली आहे. ही पुस्तकेअडीच पट जादा किमतीने काखरेदी करण्यात आली, याबाबत शिक्षणमंत्र्यांनी उत्तर द्यावे,असे आवाहन विखे पाटील यांनीकेले आहे.दिवाळी, ईद गायबखरेदी करण्यात आलेल्या ‘भारत के त्योहार’ या पुस्तकामध्ये दिवाळी आणि ईद या दोन मोठ्या सणांचा उल्लेख नाही.

टॅग्स :राधाकृष्ण विखे पाटील