आपत्तीत ‘संस्थां’चा आधार
By Admin | Updated: July 28, 2015 23:04 IST2015-07-28T23:04:53+5:302015-07-28T23:04:53+5:30
पावसाळ्यात आपत्ती ओढवलीच तर तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यासाठी विभागवार स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली आहे.

आपत्तीत ‘संस्थां’चा आधार
- नामदेव मोरे, नवी मुंबई
पावसाळ्यात आपत्ती ओढवलीच तर तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यासाठी विभागवार स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली आहे. माणुसकीच्या भावनेतून मनुष्यबळ, यंत्रसामग्रीपासून अन्नदानापर्यंत सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने आपत्कालीन आराखडा तयार केला आहे. २६ जुलै २००५ नंतर शासनाने सर्व महापालिका व नगरपालिकांना आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरात चोवीस तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. प्रत्येक विभागातील यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. परंतु नैसर्गिक आपत्ती ओढवल्यानंतर शासकीय यंत्रणेतील मनुष्यबळ कमी पडते. अशा स्थितीमध्ये नागरिकांच्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीची अत्यंत गरज असते.
नवी मुंबईमध्ये गत दहा वर्षांमध्ये सामाजिक संस्थांनी आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी मोठे सहकार्य केले आहे. दरड कोसळण्यापासून शहरात पाणी भरण्यापर्यंत कोणतीही आपत्ती ओढविण्याची शक्यता आहे. शहरात अनेक इमारती धोकादायक झाल्या आहेत. अशावेळी संबंधितांना मदत करण्यासाठी पोहणाऱ्या तरुणांसह अन्न पुरविणाऱ्या दानशुरांची गरज असते. महापालिकेने याविषयी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देवून प्रत्येक विभागातील सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पोहणारे तरुण, सर्व प्रकारच्या आपत्तीमध्ये रात्रंदिवस उपलब्ध होणारे स्वयंसेवक, होड्या, जेसीबी व सर्व प्रकारची मदत देण्याचे मान्य केले आहे.
दोन वर्षांपूर्वी दगडखाणीमध्ये दुर्घटना घडल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत बाहेर काढण्यामध्येही यश आले होते. नेरूळमधील गॅस स्फोटानंतर नागरिकांनीच मदतीचा हात पुढे करून रहिवाशांच्या जेवणापासून सर्व व्यवस्था केली होती. अनिरुद्धाज अॅकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंटचे ३०० स्वयंसेवक मदतीसाठी आवाज दिल्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहचत असतात.
300 स्वयंसेवक मदतीसाठी आवाज दिल्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहचत असतात. अनेक संस्थांनी महापालिकेकडे नोंदणी केली. ज्यांनी नोंदणी केली नाही अशा सामाजिक संस्थाही मदतीसाठी पुढे येत असल्यामुळे शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत झाली आहे.
औषधांचा पुरवठा...
आपत्कालीन परिस्थितीमध्ये पीडित नागरिकांना धान्य पुरविण्यासाठीही अनेक संस्थांनी तयारी दर्शविली आहे. नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासह अनेक रुग्णालयांनी आपत्कालीन स्थितीमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
काही संस्था मोफत औषधे पुरविणार आहेत. अशा सर्व संस्थांची यादी महापालिकेने तयार केली असून सर्व संस्थांच्या प्रमुखांचे संपर्क नंबरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आवश्यकतेप्रमाणे त्यांची मदत घेतली जाणार आहे.
नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यासह यंत्रसामग्री, अन्नपुरवठा व इतर सर्व प्रकारची मदत देण्याची तयारी संस्थांनी केली असून त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे.
- जगन्नाथ सिन्नरकर, उपायुक्त
विभागवार मदत उपलब्ध करून देणाऱ्या संस्था
बेलापूर : श्रीराम मारुती जन्मोत्सव मंडळ, बेलापूर गाव बाबला ग्रुप करावेगाव नागदेवी मित्रमंडळ
प्रियदर्शनी महिला बचत गट कुलदैवत उत्सव मंडळ नवरात्री उत्सव मंडळ शिवप्रेमी उत्सव मंडळ रोटरी क्लब, सीबीडी नर्मदा निकेतन सेक्टर ८, सीबीडी विश्वधाम सेक्टर ८ए, सीबीडी गुरुद्वारा गुरू साहिब सिंग सभा
नेरूळ : अनिरुद्ध अॅकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट, जुईनगर माता अमृतानंद संस्था सेक्टर २०, नेरूळ
तुर्भे : सौराष्ट्र पटेल समाज
ट्रस्ट अन्नपूर्णा महिला मंडळ
वाशी : रोटरी क्लब सेक्टर ६, वाशी नंदलाल आर. राजपाल, सेक्टर ८, वाशी वाशी गाव मित्र मंडळ दर्या मित्र मंडळ मरीआई मच्छीमार सहकारी संस्था इच्छापूर्ती मित्र मंडळ
कोपरखैरणे : ग्राम विकास मंडळ, कोपरखैरणे प्रकल्पग्रस्त महिला मंडळ वनिता महिला मंडळ यशोदा महिला मंडळ ग्रामविकास लघुउद्योग शिक्षण संस्था
घणसोली : ग्रामस्थ मंडळ,
घणसोली ग्रामस्थ मंडळ, तळवली
ग्रामस्थ मंडळ, राबाडा ग्रामस्थ मंडळ, गोठीवली देवस्थान मंडळ, घणसोली दिलासा सामाजिक संस्था
ऐरोली : विठ्ठल रखुमाई भक्त विश्वस्त मंडळ, दिवागाव सुपर मार्केट व्यापारी मंडळ, ऐरोली जे ग्रुप रहिवासी संघ जय अंबे उत्कर्ष महिला मंडळ तिरंगा मित्र मंडळ लोेकमान्य सेवा समिती सखी महिला मंडळ
अयप्पा मंदिर ट्रस्ट गजानन मित्र मंडळ नीळकंठ पाटील विद्यालय
दिघा : संत निरंकारी सेवा मंडळ, साठेनगर आदर्श मित्र मंडळ, गणपतीपाडा शिवसमर्थ महिला मंडळ, गणपतीपाडा पल्लवी मित्र मंडळ, रामनगर डाऊ केमिकल कंपनी, साठेनगर अनिरुद्ध अॅकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट नागरी संरक्षण दल रहिवासी सेवा मंडळ, गणपतीपाडा
काय करणार मदत?
काही संस्थांनी स्वयंसेवक उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. हॉटेल व इतर संस्थांनी अन्नधान्य पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. खाडीकिनारी व तलावांच्या परिसरातील गावांमधील तरुणांनी पट्टीचे पोहणारे स्वयंसेवक देण्याची तयारी दर्शविली आहे.
दरड घसरली, इमारत कोसळली तर जेसीबीपासून डंपर पुरविण्याचे सहकार्यही संस्था करणार असल्यामुळे पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे काम सोपे होणार आहे.