Join us  

पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिपचा बार्टीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 5:40 AM

बार्टीमार्फत १९ नोव्हेंबर २०१८ रोजी यासाठी जाहिरात देऊन आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ५९७ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. यातून लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, मुलाखत या सर्व प्रक्रिया पूर्ण करून ४०८ विद्यार्थी पात्रता यादीत होते.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत पीएचडी किंवा एमफिलचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती यावर्षी लेखी व तोंडी परीक्षेद्वारे निवड करण्यात आलेल्या केवळ १०५ विद्यार्थ्यांना न देता परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व ४०८ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, बार्टीमार्फत १९ नोव्हेंबर २०१८ रोजी यासाठी जाहिरात देऊन आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ५९७ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. यातून लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, मुलाखत या सर्व प्रक्रिया पूर्ण करून ४०८ विद्यार्थी पात्रता यादीत होते.पीएचडीसाठीचे ६० टक्के व एमफिलसाठीचे ४० टक्के असे १०५ विद्यार्थी निवडले जातात, परंतु सर्वच पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली होती, त्यानुसार निर्णय घेतला.

टॅग्स :शिक्षण क्षेत्रमहाराष्ट्र सरकार