पोलिसांची पाठ फिरताच बारमध्ये ‘छमछम’
By Admin | Updated: March 7, 2015 01:31 IST2015-03-07T01:31:05+5:302015-03-07T01:31:05+5:30
छापा घालण्यासाठी गेलेल्या पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा छम छम सुरू करणाऱ्या ‘सी हॉक’ बारच्या मॅनेजरसह चार बारबालांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांची पाठ फिरताच बारमध्ये ‘छमछम’
जितेंद्र कालेकर - ठाणे
छापा घालण्यासाठी गेलेल्या पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा छम छम सुरू करणाऱ्या ‘सी हॉक’ बारच्या मॅनेजरसह चार बारबालांनाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका सामान्य नागरिकाने पुढाकार घेऊन हा प्रकार उघडकीस आणला.
पोलीस आल्याची वर्दी बारमधल्यांना सहज मिळत असे. त्यामुळे कारवाई करणे अशक्य झाले होते. पोलिसांची पाठ फिरली की, लगेच छम छम सुरू होते, अशी टीप एका दक्ष नागरिकाने वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त व्ही. बी. चंदनशिवे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला होता. तोही दौलतजादा होत असतानाच्या क्लिपिंगसह.
५ मार्च रोजी ९.३० ते ११च्या दरम्यान कासारवडवली पोलिसांनी याच बारमध्ये राबविलेल्या धाडसत्रात मात्र सगळा प्रकार उघड झाला. मॅनेजर छोटनकुमार शाहू याच्यासह चार सिंगर कम बारबाला मुलींचीही पळतांना एकच धमछाक झाली. बारमध्ये रेड पडली तेंव्हा या मुलींसह इतर काही मुली गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील नृत्य करीत होत्या. तर काही पुरुष गिऱ्हाईक मंडळी त्यांच्यावर पैसे उधळत होती. हॉटेलचे मालक आणि मॅनेजर यांनी या मुलींना असे करण्यास परवानगी दिली होती. परवानगी पेक्षा जास्त मुली सिंगर म्हणून ठेवल्याचेहीआढळले. एका दक्ष नागरिकाने धाडस दाखवून बारमधला हा ‘छमछमाट’ उघड केल्यानंतर पोलीसांनीही धाडसत्र राबवून अश्लील नृत्य करणे, गिऱ्हाईकांना आकर्षित करणे, असभ्य वर्तन आदी कलमांखाली या मुलींसह बार व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक कर्पे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
च्पोलीस आले की, व्यवस्थापक एक कळ दाबतो. त्यामुळे बारमधले सर्वच जण सावध होतात आणि सामसूम होते. मग कारवाई तरी कोणावर आणि कशी करणार हा प्रश्न पोलिसांना पडतो.