सौंदर्य प्रसाधनांच्या मंदिरात बाप्पा
By Admin | Updated: September 5, 2014 23:22 IST2014-09-05T23:22:23+5:302014-09-05T23:22:23+5:30
सौंदर्याचा उपासक असलेल्या श्री गणोशाला उथळसरच्या वॉकरवाडीतील शिवगर्जना मित्र मंडळाने 4क् हजारांच्या सौंदर्य प्रसाधनांची कलात्मक आरास करुन मंदिर उभारले आहे.

सौंदर्य प्रसाधनांच्या मंदिरात बाप्पा
जितेंद्र कालेकर - ठाणो
सौंदर्याचा उपासक असलेल्या श्री गणोशाला उथळसरच्या वॉकरवाडीतील शिवगर्जना मित्र मंडळाने 4क् हजारांच्या सौंदर्य प्रसाधनांची कलात्मक आरास करुन मंदिर उभारले आहे. याच मंदिरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. वेगळय़ा त:हेने नटलेल्या या बाप्पाचे सर्वागसुंदर मनमोहक रुप पाहण्यासाठी भाविक आवजरून भेटी देत आहेत.
उथळसर ठाणो महापालिका शाळा क्रमांक सातच्या जवळ असलेल्या सार्वजनिक श्री गणोशोत्सव मंडळाची स्थापना 1986 मध्ये झाली. शिवगर्जना मित्र मंडळाकडे व्यवस्थापन असलेल्या या गणोशोत्सवाचे यंदाचे 29 वे वर्ष आहे.अमित पार्टे या कार्यकत्र्याच्या कल्पनेतून सौंदर्य प्रसाधनांचे हे 13 फूट उंचीचे मंदिर साकारण्यात आले आहे. प्लाय आणि पुठयाचा वापरातून चार खांबांचे हे अष्टकोनी मंदीर तयार करण्यात आले आहे. नंतर त्यावर ही सौदर्यप्रसाधने चिकटविण्यात आली आहेत. यामध्ये प्रत्येकी एक हजार बांगडया आणि टिकल्या, मण्यांच्या 6क् माळा, 7 डझन आरसे, 2क्क् फणी, 5क्क् हेयर क्लीप, 2क्क् हेयर बँन्ड, 35क् मेकअप पेन्सिल, काजळाच्या 3क्क् डब्या, 3क्क् लीप ग्लॉस, 1क्क् पावडर डबी आणि 2क्क् नेलपॉलिश डबींचा वापर करुन मंदिराचा गाभारा, खांब आणि ¨भतींवर नक्षी करण्यात आली आहे. मंडळाने मंडपात सुविचारांचे 35 छोटे फलकही लावले आहेत.
दैनंदिन वापराच्या वस्तुंमधून आरास साकारतांना सामाजिक भान ठेवणो हे मंडळाचे वैशिष्टय यंदाही कायम आहे. मंडळाच्याच 15 कार्यकत्र्यांनी कोणत्याही प्रोफेशनल आर्टीस्टची मदत न घेता ही हे मंदीर उभे केले आहे. मंडळाकडे 5क् ते 6क् हजारांची देणगी तसेच दानपेटीतही सहा हजारांपर्यन्त रक्कम जमा होते. यंदा 4क् ते 5क् हजारांचा खर्च सजावटीसाठी आला असला तरी या सजावटीतूनच सामाजिक उपक्रम साधण्यात येणार आहे.
ही सर्व सौंदर्य प्रसाधने येऊरच्या आदिवासी पाडयातील अनाथलयातील मुलींना देण्यात येणार आहेत. मूर्तीही फार मोठी न ठेवता तिची उंची गेल्या अनेक वर्षापासून तीन फूट एक इंच इतकीच ठेवण्यात आली आहे.
मंडळाकडे भाविक स्वेच्छेने देणगी देतात. मात्र, ती सर्व यथाशक्ती उत्स्फूर्त दिली जाते. कोणावरही वर्गणीची सक्ती केली जात नसल्याचे मंडळाचे उपाध्यक्ष सुधीर कडू यांनी सांगितले.मंडप डेकोरेटर नेहमीचा असल्याने तो अल्प खर्चात उभा केला जातो. उर्वरित वर्गणीच्या रक्कमेतून भजन, जेष्ठ नागरिकांचा सत्कार, आदिवासी मुलांना फराळ तसेच गरिब गरजूंच्या मुलां मुलींच्या लग्न कार्यासाठी आणि गंभीर आजारपणासाठी आर्थिक हातभारही मंडळाकडून लावला जातो.
रात्री 1क् नंतर ध्वनीक्षेपक बंद
ध्वनीक्षेपक रात्री 1क् नंतर बंद करण्यात येतो. शिवाय, विसर्जन मिरवणूकीत डीजे, फटाके आणि गुलालही नसतो. मंडळाने अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजनाही केली आहे. सर्वच काटेकोर काळजी घेऊन सामाजिक भान ठेवणा:या या मंडळाला पोलिस, ठाणो महापालिका आणि राजकीय पक्षांनीही गौरविले आहे.
मंडळाने यापूर्वी चॉकलेटचा बंगला, सुका
मेवा, भातुकलीची खेळणी आणि पेन्सिलचे मंदीर उभे केले होते. त्यामुळे नेहमीच सामाजिक संदेश देत वेगळी कल्पना घेऊन येणा:या या मंडळाचा गणोशोत्सव भक्तांचे नेहमीच आकर्षण ठरला आहे.