Join us  

सोने कमी भावात देतो सांगून बंटी - बबलीने घातला सराफाला लाखोंचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 8:41 PM

सराफाकडून घेतले २७ लाख रुपये

मुंबई - कस्टममध्ये अधिकारी ओळखीचे असल्याची बतावणी करून सोने स्वस्तात मिळवून देतो असे सांगून बंटी - बबलीने बोरिवलीतील एका सराफाला लाखोंचा गंडा घातला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष - १० ने आरोपी अल्ताफ मोहम्मद कागजी उर्फ साहिल उर्फ सॅम्युल (वय - ३३) आणि बोगस कस्टम अधिकारी बबिता चौहान उर्फ (वय - २५) या बंटी बबलीला बेड्या ठोकल्या आहेत. 

आरोपी अल्ताफ हा मीरा रोड तर बबिता दहिसर येथे राहते. बोरिवली पूर्व येथील सिद्धार्थ नगरमध्ये राहणाऱ्या ३८ वर्षीय  सराफाला कांदिवली येथे भेटून कस्टम विभागाने जप्त केलेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून २७ लाखांना गंडा बाट बंटी - बबलीला घातला आहे. पोलिसांनी आरोपींकडून ३०० ग्रॅम सोने  हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे. खरी ओळख लपवून बबीता अमरसिंग चौहान हि कस्टम अधिकारी असल्याचे भासवून सोहेल असे स्वतःचे नाव सांगून त्याने सराफाला प्रतितोळा २७ हजार दराने स्वतात देतो अशी बतावणी केली. ठरल्याप्रमाणे १५ जून २०१८ रोजी सराफ अंधेरी पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ, पार्किंग लेवल ६, स्टार बस कॉफी शॉप या ठिकाणी गेला. त्याठिकाणी सोहेलने रचलेल्या कटानुसार बबिताची कस्टम अधिकारी असल्याचे सांगत ती स्वस्तात सोने देईल अशी थाप मारली आणि २७ लाख रुपये घेतले. पांडे नावाची व्यक्ती सोने घेऊन येईल असे सांगून सोहेलने आणि बबिताने मोबाईल बंद करून पाल काढला. २५ जूनपर्यंत सराफाने वाट पहिली मात्र, त्याला काही सोनं मिळालं नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर सराफाने या प्रकरणाची सहार पोलीस ठाण्यात तक्रार दखल केली. सहार पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा नोंद केल्यानंतर या गुन्ह्याच  समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट - १० च्या पोलिसांनी सुरू केला. विमानतळ परिसरात सीसीटीव्हीत कैद झालेल्या बंटी - बबलीच्या चित्रीकरणामुळे,  दुसऱ्याच्या नावे घेतलेले आणि बंद ठेवलेल्या मोबाईलच्या माध्यमातून आणि मध्यस्थ्यांची गोळा केलेली माहिती यांची सांगड घालत  तांत्रिक अभ्यास करून यातील आरोपींचा वसई येथे तपास घेत असताना पोलिासांना यातील आरोपी दहिसर पूर्वेकडील कोकणीपाडा या ठिकाणावरून बबिता व अल्ताफ याला अटक केली. त्यांच्याकडून ३०० ग्रॅम सोने (किंमत १० लाख) हस्तगत केले आहे. ही कामगिरी कक्ष  - १० चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे, पोलीस निरीक्षक आनंद भोईर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, गंगाधर चव्हाण, नार्वेकर, पाटील गवेकर, कांबळे, रोकडे ठोंबरे या पथकाने पार पाडली.

 

 

टॅग्स :मुंबईगुन्हाधोकेबाजी