साकव तुटला; ग्रामस्थांची गैरसोय

By Admin | Updated: January 16, 2015 22:42 IST2015-01-16T22:42:16+5:302015-01-16T22:42:16+5:30

सोनघर येथील रोहण, वलंग, विठ्ठलवाडी या गावांना जोडणारा २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला साकव काही दिवसांपूर्वी अचानक तुटल्याने

Banned; Disadvantages of the villagers | साकव तुटला; ग्रामस्थांची गैरसोय

साकव तुटला; ग्रामस्थांची गैरसोय

महाड : सोनघर येथील रोहण, वलंग, विठ्ठलवाडी या गावांना जोडणारा २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला साकव काही दिवसांपूर्वी अचानक तुटल्याने सोनघर येथून वलंग व विठ्ठलवाडी येथील ग्रामस्थ तसेच विद्यार्थी वर्गाचे हाल झाले आहेत.
सोनघर या गावातील प्रामुख्याने शिक्षणासाठी या साकवावरुन वलंग येथील हायस्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले असून हा साकव तुटल्यामुळे या विद्यार्थ्यांना अर्धा ते पाऊण तासाचे अधिक अंतर कापून यावे लागते. यामुळे शाळेत येण्यासही उशीर होत असतो. काही दिवसांपूर्वी हा साकव कोसळला त्याचवेळी विद्यार्थ्यांची वाहतूक चालू होती. परंतु सुदैवाने अनर्थ टळला.
हा साकव संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बांधून येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी या विभागातील ग्रामस्थ करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Banned; Disadvantages of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.