बँकेच्या सहव्यवस्थापकानेच केल्या ग्राहकांच्या ठेवी हडप

By Admin | Updated: September 27, 2014 03:11 IST2014-09-27T03:11:20+5:302014-09-27T03:11:20+5:30

एपीएमसी येथील करुर वैश्य बँकेत सहव्यवस्थापकानेच ग्राहकाच्या ठेवीतून रक्कम हडप केल्याचा प्रकार घडला आहे.

Bank deposits made by the bank's manager | बँकेच्या सहव्यवस्थापकानेच केल्या ग्राहकांच्या ठेवी हडप

बँकेच्या सहव्यवस्थापकानेच केल्या ग्राहकांच्या ठेवी हडप

नवी मुंबई : एपीएमसी येथील करुर वैश्य बँकेत सहव्यवस्थापकानेच ग्राहकाच्या ठेवीतून रक्कम हडप केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामिळनाडू राज्यातील करुर वैश्य बँकेच्या एपीएमसी शाखेत हा प्रकार घडला आहे. डिसेंबर २०१३ ते २०१४ दरम्यान हा प्रकार घडला आहे. सदर बँकेमध्ये एका अनिवासी भारतीयांचे बँक खाते आहे. त्यांच्या या खात्यामधून २५ लाख ६० हजार रुपयांचा अपहार झाला आहे. त्याशिवाय एका इतर ग्राहकांच्याही खात्यांमधून ४ लाख ३९ हजार रुपयांचा अपहार झाला आहे. बँक व्यवहारातील संशयावरून तपासणीत ही बाब उघड झाली. तसेच बँकेच्या एपीएमसी येथील शाखेचे तत्कालीन सहव्यवस्थापक मंथाकुमार व्ही. आर. के. पी. यांनी हा प्रकार केल्याचेही समोर आले. त्यानुसार एपीएमसीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंथाकुमार हे एपीएमसी येथून हैदराबाद येथील शाखेत बदलीवर गेले असता तेथेही ग्राहकांच्या ठेवी हडप केल्या आहेत. या प्रकारानंतर मात्र ते फरार झाले आहेत. बँकेच्या खातेधारकांच्या ठेवी मोडून त्याची रक्कम ते दुसऱ्या बँक खात्यात जमा करायचे. त्यानंतर ही रक्कम ते काढून घेत, असे पोलीस निरीक्षक गोविंद आरळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Bank deposits made by the bank's manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.