वांद्रे सामूहिक बलात्कार : एका आरोपीला अटक

By Admin | Updated: August 9, 2014 02:14 IST2014-08-09T02:14:37+5:302014-08-09T02:14:37+5:30

वांद्रे येथील एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणा:या तीन आरोपींपैकी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Bandra gang rape: One accused arrested | वांद्रे सामूहिक बलात्कार : एका आरोपीला अटक

वांद्रे सामूहिक बलात्कार : एका आरोपीला अटक

>मुंबई : वांद्रे येथील एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणा:या तीन आरोपींपैकी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हा आरोपी रिक्षा चालक असून त्याला मानखुर्द येथून अटक करण्यात आली. तसेच इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. 
पीडित मुलीला आई-वडील नसून ती तिच्या लहान भावासोबत वांद्रे येथे वास्तव्य करते. उदरनिर्वाहासाठी ती घरकाम करते. आरोपींपैकी एकाने तिला विवाहासाठी विचारले होते. त्यास तिने नकार दिला होता. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास या आरोपींनी तिचे वांद्रे येथून अपहरण केले. त्यानंतर मानखुर्द येथे नेऊन त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. मात्र सकाळी या मुलीने पळ काढला व वांद्रे पोलिसांत याची तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)

Web Title: Bandra gang rape: One accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.