मांसविक्री बंदी उठली
By Admin | Updated: October 10, 2015 01:23 IST2015-10-10T01:23:56+5:302015-10-10T01:23:56+5:30
महापालिकेतर्फे पर्यूषण काळात राज्य सरकारच्या बंदी व्यतिरिक्त मांस विक्रीवर घालण्यात आलेली दोन दिवसांची बंदी सभागृहात बहुमताने शुक्रवारी उठविण्यात आली.

मांसविक्री बंदी उठली
मुंबई : महापालिकेतर्फे पर्यूषण काळात राज्य सरकारच्या बंदी व्यतिरिक्त मांस विक्रीवर घालण्यात आलेली दोन दिवसांची बंदी सभागृहात बहुमताने शुक्रवारी उठविण्यात आली.
पर्यूषण काळात राज्याने मांस विक्रीवर दोन दिवसाची बंदी घातली होती. या बंदी व्यतिरिक्त पालिकेने १९६४ व १९९४ साली दोन दिवसांची बंदी घातली होती. त्यामुळे मुंबईत मांस विक्रीवर चार दिवसांची बंदी होती. या प्रकरणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी दोन दिवसांची बंदी उठवावी, असे निर्देश आयुक्तांना सभागृहात दिले होते. शिवाय यासंबंधीचा प्रस्ताव नव्याने आणण्यात यावा, अशी मागणी सपाचे गटनेत रईस शेख यांनी प्रस्तावाद्वारे केली होती. भाजपाने यावर मतदानाची मागणी केली होती. मतदानावेळी १९६४ सालची बंदी उठविण्यासाठी १११ मते पडली; बंदी राहावी म्हणून २४ मते पडली. १९९४ सालची बंदी उठविण्यासाठी ११३ मते पडली तर बंदी राहावी म्हणून २३ मते पडली. त्यामुळे आता मुंबईमध्ये महापालिकेने दोन दिवसांची बंदी उठवलेली आहे. राज्य सरकारने घातलेली मांस विक्रीवरील दोन दिवसांची बंदी कायम राहणार आहे.